पुरस्कार,गौरव
…या ग्रामपंचायतकडून महिलांचा सन्मान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी या दोन्ही कार्यक्रमांचे औचित्य साधून ग्रामपंचायत पढेगाव यांनी महिलांशी हितगुज साधून महिलांचा सन्मान केला आहे.
भारतात १९४३ साली पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.स्वातंत्र्यानंतर,१९५० सालापासून भारतीय राज्य घटनेने,स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे.संयुक्त राष्ट्रांनी सन-१९७५ हे जागतिक महिला वर्ष घोषित केले जे भारतातही साजरे झाले.०८ मार्च हा,’महिला दिन’,जगभरातल्या अनेक देशांप्रमाणेच भारतातही साजरा केला जातो.तो कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक मिनाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या.वर्धिनी गटातील महिला व सी.आर.पी.सोनाली नांगरे यांनीही याप्रसंगी शासकीय योजनांची माहिती दिली आहे.गावातील आशा सेविका कर्मचारीही कार्यक्रमास उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षिका शबाना तांबोळी यांना,’नॅशनल इनोवेशन टीचर्स अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मिनाताई शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी शाळेतील शिक्षिका विद्युल्लता आढाव,इंदुमती वाबळे,काळेबेरे,मढवई,भोसले,वाघ यादेखील उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक बाबासाहेब गुंड यांनी केले तर कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सोनाली नांगरे यांनी आभार मानले आहे.