जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…आणि..त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांस रडू कोसळले !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव येथील तहसीलदार यांचे प्रताप बाहेर आल्यावर त्यांनी बनाव करून उलट आरोग्य विभागास सामाजिक संकेत स्थळावर बदनाम करण्याचे षडयंत्र रचले परिणामस्वरूप कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी दुखावले असून त्याचा प्रत्यय नुकताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात समोर आला असून तेथे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर आलेल्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांच्या भावनांचा बांध फुटला असून त्यांनीं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे.त्यामुळे शहरात या चर्चेला उधाण आले आहे.

डॉ.कृष्णा फुलसौन्दर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षाच्या ‘कोरोना साथीच्या’ खडतर काळातील कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची सेवा आठवली असून हजारो रुग्णांना जीवदान दिले आहे.आपली सेवा स्मरून केवळ,”गरज सरो आणि वैद्य मरो” अशी समाजाची रीत असून आपल्याला त्याचा दाहक अनुभव आला असल्याचे सांगून त्यांना आणखी पुढे बोलता आले नाही त्यांनी कशाबशा पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या व हुंदका आवरताना त्यांना जड गेले असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक,सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांचे आदेश नुकतेच जारी झाले आहेत.पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अध्यक्षतेखाली अस्थापना मंडळाच्या बैठकीत हे आदेश देऊन संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले असल्याने त्याबाबत कारवाही सुरु झाली होती.त्यात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे नुकतेच नाशिक ग्रामीणला रुजू होण्यासाठी रवाना झाले असून त्यांच्या जागी आता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे रुजु झाले आहे.त्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे त्यांचे सहकारी त्यांना नुकताच सायंकाळी भावपूर्ण निरोप दिला आहे.त्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात सायंकाळी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे होते.त्यावेळी निरोप संभारंभात उपस्थित सूत्रसंचालक यांनी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांना बोलण्याचा आग्रह करण्यात आला होता.त्यावेळी ते आपल्या अश्रूंना आवरु शकले नाही.

दरम्यान याच काळात तहसीलदार विजय बोरुडे यांनीं भल्या पहाटे कर्तव्य (?) पथावर जाऊन कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाणे व त्यानंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य परीचारिकेचा विनयभंग केला होता.त्यात सदर विनयभंगाचा प्रकार सि.सी.टी.व्ही.त उघड झाला असल्याचे मानले जात आहे.व त्यांनी आपली चूक झाकण्यासाठी आपल्या समर्थक व लाभार्थ्यामार्फत आरोग्य विभागाच्या विरुद्ध आपल्या लाभार्थ्यासह सामाजिक संकेतस्थळावर मोठी मोहीम छेडली होती.व त्यासाठी तहसील समर्थक काही साजीद्यांनी तहसील मध्ये काम घेऊन येणाऱ्या काही नागरिक आणि कार्यकर्ते आदींना,’तुमचे काम करतो,पण साहेबांना पाठींबा देण्याचे पत्र आणा’ असे बजावले असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान या मोहिमेने या विभागास बदनाम केले होते.त्यातून शहरातील व तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि व त्यांच्या स्थानिक स्वराज्य,व सहकारी संस्था,विविध राजकीय संघटना,काहीं नगर परिषदेचे माजी पदाधिकारी आदींनी पाठींबा दिला होता.मात्र त्या बाबत आमच्या प्रतिनिधीने वस्तुस्थिती छापून या घटनेतील तथ्ये समोर आणले होते.त्या नंतर मात्र पाठींबा आणि मोर्चे बंद झाले होते.मात्र प्रस्थापित नेत्यांनी चकार शब्द काढला नाही हे विशेष ! मात्र या घटनेने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात दुखावले गेले होते.त्यातूनच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.त्यातून हि दुर्दैवी घटना घडली आहे.

त्यावेळी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षाच्या ‘कोरोना साथीच्या’ खडतर काळातील कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची सेवा आठवली असून हजारो रुग्णांना जीवदान दिले आहे.आपली सेवा स्मरून केवळ,”गरज सरो आणि वैद्य मरो” अशी समाजाची रीत असून आपल्याला त्याचा दाहक अनुभव आला असल्याचे सांगून त्यांना आणखी पुढे बोलता आले नाही त्यांनी कशाबशा पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या व हुंदका आवरताना त्यांना जड गेले असल्याचे दिसून आले आहे.त्या नंतर त्यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले आहे.या घटनेने कोपरगाव शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे,कोपरगाव बेट येथील शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,सेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडीयाल,सेनेचे माजी शहर प्रमुख अस्लम शेख,भरत मोरे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,एस.सी.पवार,तुषार धाकराव,स्वच्छता दूत सुशांत घोडके,महिला आघाडीच्या विमल पुंडे,कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.कृष्णा फुलसुंदर,ऍड.नितीन पोळ,अनिल सोनवणे,आदी मान्यवरांसह शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close