न्यायिक वृत्त
कोपरगावातील…या इमारतीच्या कामाची निविदा प्रसिद्ध-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीसाठी २८.२१ कोटीच्या कामाची निविदा आज एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली असल्याची,’आनंद वार्ता’ विधी क्षेत्रातील तज्ञ आणि नागरिकांना कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये दिली आहे.
दरम्यान या इमारतीतील अडचणी दूर झाल्या असल्याचे मानले जात आहे.आता इमारत कधी पूर्ण होणार व ती दर्जेदार होणार का ? की त्याचे राज्य परिवहन मंडळाचे,’कोपरगाव बस आगार होणार’ हे लवकरच समजणार आहे.त्याबाबत कोपरगाव वकील संघास जागृत रहावे लागणार आहे.
कोपरगाव शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत मुदतबाह्य झाली होती तरी देखील या ठिकाणी न्यायालयीन कामकाज सुरु होते मात्र कामकाजात अडचणी येण्याचा धोका वर्तविण्यात येत होता.त्यासाठी विधी क्षेत्रातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचेकडे सदर इमारतीसाठी तत्कालीन अध्यक्ष अड्.शिरिषकुमार लोहकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता.त्यासाठी आ.काळे यांनी तापूर्ती व्यवस्था करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वर असललेल्या दुसऱ्या तात्पुरती मजल्यावर व्यवस्था केली होती.त्या कामास पूर्ण होऊन गत दोन वर्षांपासून काम सुरु झाले होते.मात्र या निधीच्या कामास मुहूर्त लाभत नव्हता तो अखेर आज लाभला असून त्याची निविदा अ.नगर जिल्ह्यातील एका दैनिकात प्रसिद्ध झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान या इमारतीतील अडचणी दूर झाल्या असल्याचे मानले जात आहे.आता इमारत कधी पूर्ण होणार व ती दर्जेदार होणार का त्याचे राज्य परिवहन मंडळाचे,’कोपरगाव बस आगार होणार’ हे लवकरच समजणार आहे.