कोपरगाव तालुका
तालुक्यातील सरकारी अधिकाऱ्यांवर कुणाचाही धाक नाही-आरोप
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी खा.शंकरराव काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यानंतर तालुक्यातील सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कुणाचाही वचक राहिला नाही.यावर आजी-माजी आमदार यांनी मौन धारण केल्यामुळे त्याचा तालुक्यातील नागरिकांना फटका बसत आहे अशी टीका कोपरगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
“कोपरगाव तालुक्यातील धोरणात्मक शासकीय काम झाल्यावर श्रेय घेण्यास चढाओढ लागते मात्र शेती सिंचन,न मिळणारी वीज,नादुरुस्त रस्ते प्रश्न,पिण्याचे पाणी,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रलंबित इमारत,तालुक्याचे औद्योगिकरण,तरुणांची बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या भांडवलातून उभारण्यात आलेले सहकारी साखर कारखान्यांचे कायद्याच्या चाकोरीत करण्यात येणारे खाजगीकरण,सरकारी तथा सार्वजनिक संस्था ऐवजी स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्थांचा लक्षवेधीपणे होणारा विकास आदी जनतेच्या प्रश्नावर ही मंडळी सोयीस्कर मौन धारण धरते.त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी निर्ढावले आहेत”-नितीन शिंदे.अध्यक्ष,कोपरगाव तालुका काँग्रेस.
कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात अवेळी घुसून तेथील परिचारिका आणि एका तरुणीचा तालुका दंडाधिकारी विजय बोरुडे यांनी दि.२५ फेब्रुवारी रोजी विनयभंग केला असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात हा आरोप केला आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटलं हे की,”कोपरगाव तालुक्यात माजी खा.शंकरराव काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक होता.मात्र त्यांच्यानंतर तालुक्याचे चित्र बदलले आहे.शासकीय काम झाल्यावर श्रेय घेण्यास चढाओढ लागते मात्र शेती सिंचन,न मिळणारी वीज,नादुरुस्त रस्ते प्रश्न,पिण्याचे पाणी,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रलंबित इमारत,तालुक्याचे औद्योगिकरण,तरुणांची बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या भांडवलातून उभारण्यात आलेले सहकारी साखर कारखान्यांचे कायद्याच्या चाकोरीत करण्यात येणारे खाजगीकरण,सरकारी संस्था ऐवजी स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्थांचा लक्षवेधीपणे होणारा विकास आदी जनतेच्या प्रश्नावर ही मंडळी सोयीस्कर मौन धारण धरते.त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी निर्ढावले आहेत याचा फटका सामान्य माणसाला बसत असल्याचा आरोप केला आहे.
प्रचंड खर्च करून येथील आरोग्य केंद्राला उपजिल्हा दर्जा मिळाला आहे.येथे अधिकारी व कर्मचारी यांची ५२ मंजूर पदे असली तरी रात्रीच्या वेळेस केवळ दोनच कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे तालुक्याची आरोग्य व्यवस्था अक्षरशः वाऱ्यावर आहे.एकीकडे या यंत्रणेवर होणारा वारेमाप खर्च तर दुसरीकडे रुग्णांना मिळणारी अपुरी सेवा यामध्ये सामान्य जनता पिचली आहे.याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांना अवगत केल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव तालुक्यात घडलेली घटना निंदनीय असून स्व.काळे व कोल्हे यांच्या कार्यकाळात असा प्रकार कधीही घडला नाही मात्र असे प्रकार आजच का घडत आहेत ? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजी-माजी आमदारांनी या प्रकरणावर मौन पाळल्याने नागरिकांना संशय घेण्यास जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांनी यातून बोध घेऊन आपल्या कार्यपद्धतीत बदल घडवून जनतेचे जीवन सुकर करावे असे आवाहन शिंदे यांनी शेवटी केले आहे.