गुन्हे विषयक
उपकारागृहात शस्र पुरवताना एकास अटक,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या उपकारगृहात काल दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शिर्डी विठ्ठलवाडी येथील आरोपी रोशन वाल्मिक सोनवणे (वय-२३)हा या कारागृहात असलेल्या आरोपीस अज्ञात कारणासाठी सुरा पूरवताना आढळून आला आहे.मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या हि बाब वेळेवर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव उपकारगुहात बऱ्याच वेळा येथे आरोपीना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईक आणि त्यांच्या संबंधीत इसमाकडून भ्रमणध्वनी,गांजा,अफू व तत्सम विविध अवैध सेवासुविधा पूरविण्यात तेथील संबंधित अधिकारी आपला हात साफ करताना वेळोवेळी दिसून येत आहेत.आरोपींना भेटण्यास मोठी बिदागी संबंधीताना मोजावी लागते.मात्र यावर आवाज उठवूनही त्यात कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.तेथील नवख्या आरोपीवर गंभीर गुंह्यातील आरोपी हे अनैसर्गिक अत्याचार होत असल्याच्या बातम्या आहे.
कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत जुने उपकारागृह असून यात ०७ बराकी आहे.यात आरोपीना ठेवण्याची क्षमता केवळ २५-३० आहे मात्र या ठिकाणी बऱ्याच वेळा गंभीर गुंह्यातील ३५-४० आरोपींना ठेवण्यात येते.गत महिन्यात याठिकाणी जवळपास एकूण ९० च्यावर आरोपी जेरबंद होते.त्यात कोपरगाव शहर,तालुका पोलीस ठाणे,शिर्डी,राहाता,लोणी,श्रीरामपूर आदी ठिकाणच्या भा.द.वि.खुनाचे कलम-३०२,खुनाचा प्रयत्न कलम-३०७,दरोडा कलम-३९५,बलात्कार-३७६ आदी गंभीर गुंह्यातील ३५ आरोपींचा समावेश होता.यात प्रामुख्याने शिर्डी येथील सुरज ठाकरे,यांचेवर गोळीबार केलेला आरोपी किरण हजारे,तनवीर रंगरेज,आकाश लोखंडे,आदीसह शिर्डी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिंगटोन प्रकरणातील सागर शेजवळ खून प्रकरणातील आरोपी सोमनाथ वाडेकर,रामा जाधव,दीपक मांजरे,शोएब शेख,किरण आजबे,विशाल कोते आदींचा समावेश आहे.याशिवाय लोणी येतील पोलीस ठाण्यातील धोकादायक आरोपी शाहरुख सत्तार खान आदींचा समावेश होता.त्यामुळे येथील आरोपी बाबत किती गंभीरता यायला हवी मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
बऱ्याच वेळा येथे आरोपीना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईक आणि त्यांच्या संबंधीत इसमाकडून भ्रमणध्वनी,गांजा,अफू व तत्सम विविध अवैध सेवासुविधा पूरविण्यात तेथील संबंधित अधिकारी आपला हात साफ करताना वेळोवेळी दिसून येत आहेत.आरोपींना भेटण्यास मोठी बिदागी संबंधीताना मोजावी लागते.याबाबत आमच्या प्रतिनिधीने वेळोवेळी हि बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे.मात्र त्यानंतरही त्यात कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.पूर्वी या ठिकाणी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे रात्रीतून दोनदा भेट देऊन या गुन्हेगारीवर लक्ष ठेवत असत मात्र वर्तमानांत त्याची वानवा दिसत आहे.
नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना उघड झाली असून दि.२४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास तेथे घडली असून त्या ठिकाणी पो.ना.मारुती गंभीरे,शिर्डी,तालुका पो.कॉ.सुकटे,कोपरगाव शहराचे श्री.काठे,एस.एस.मोरे राहता पो.ठाणे आदी पोलीस कर्मचारी हे कर्तव्यावर असताना उपकारागृहाच्या जवळ शिर्डी येथील संशयित रोशन सोनवणे हा तरुण फिरताना आढळून आला आहे.तो त्याच्याकडे असलेला लोखंडी सुरा एका गंभीर गुंह्यातील आरोपीस पूरवताना आढळून आला आहे.सदर बाब वेळीच पोलिसांच्या लक्षात आली आहे त्यांनी सदर बाब तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांच्या लक्षात आणून दिली आहे.त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचे कौतुक होत आहे.
त्यामुळे सदर लोखंडी सूरा कोणास मारण्यास आणला होता असा सवाल निर्माण झाला आहे.सदर हत्यार जर कारागृहात गेले असते तर काय झाले असते असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे शहर पोलिसांना सदर आरोपीकडून त्याचा उद्देश समजून घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.सदर आरोपीने सदरचा सुरा हा शिर्डीतील गंभीर गुन्ह्यातील आरोपी विशाल कोते यास देण्यास आणला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मारुती लहानु गंभीरे यांनी गु.नो.क्रं.८५/२०२३ शस्र अधीनियम १९५९ चे कलम ४,२५ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.