नगर जिल्हा
एकल भगिनीला दिली आर्थिक मदत !
न्यूजसेवा
राहुरी-(प्रतिनिधी)
देवळाली प्रवरा येथील एकल भगिनी सुषमा अशोक पळंदे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नाने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून राहुरी तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार पूनम दंडीले यांचे हस्ते आज वीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहिती प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांनी दिली आहे.
निराधारांना आधार मिळावा यासाठी १९८०मध्ये संजय गांधी निराधार योजना सुरू झाली.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ही योजना राबवण्यात येते.यात २६ जानेवारी,२०१०पासून एकल महिलांचा समावेश करण्यात आला.विधवा,घटस्फोटित,देवदासी,तृतीयपंथी,४० टक्के अपंगत्व असलेल्या,अनाथ,वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला,तुरुंगात ज्यांचे पती शिक्षा भोगत आहे किंवा ३५ वर्षांवरील निराधार अविवाहित,दुर्धर सिकलसेलग्रस्त एकट्या महिलांसह एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलेलाही लाभ देण्यात येतो.त्यासाठी प्रहार संघटनेने जागृती सुरु केली आहे.
प्रसंगी अव्वल कारकून शैलजा देवकाते मॅडम,संजय गांधी योजनेचे मंगेश साठे,प्रहार जनशक्ति पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष,प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे,प्रहारचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष किरण पंडित आदी उपस्थित होते.
देवळाली प्रवरा येथील एकल भगिनी सुषमा पाळंदे यांचे पती अशोक पाळंदे यांचा नुकताच अपघाती मृत्यू झाल्याने सुषमाताई यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील प्रहारचे कार्यकर्ते धावून आले, व जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत सुषमा पाळंदे यांना तात्काळ मदत देण्याची राहुरी तहसीलदार यांचेकडे प्रहारचे आप्पासाहेब ढूस यांनी विनंती केली होती.त्या विनंतीस प्रतिसाद देऊन राहुरीच्या तहसीलदारांनी तात्काळ सुषमा पाळंदे यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून वीस हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.आज प्रहार कार्यकर्त्यांचा उपस्थितीत सुषमा पाळंदे यांना नायब तहसीलदार पुनम दंडीले यांचे हस्ते वीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी सुध्दा श्रीमती पाळंदे यांचा अर्ज भरून घेतला असून लवकरच त्यांना या योजनेचाही लाभ देण्यात येईल असे नायब तहसीलदार दंडीले मॅडम यांनी सांगितले आहे.
तहसिल कार्यालयाकडून एकल भगिनी सुषमा पाळंदे यांना तात्काळ मदत दिल्या बद्दल आप्पासाहेब ढूस यांनी तहसीलदार एफ आर शेख साहेब यांचेसह सर्व नायब तहसीलदार आणि तहसील कर्मचारी व या कामी सहकार्य केलेल्या बाळासाहेब कराळे यांचेसह सर्व प्रहार कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहे.