धार्मिक
साईबाबांच्या पुजेसासाठी फुलझाडांची लागवड करण्याचा संस्थानचा मानस-मुख्य कार्यकारी अधिकारी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्थेच्या वतीने महाशिवरात्री पर्वाचे औचित्य साधुन मौजे रूई येथील सुमारे ०१ एकर क्षेत्रात संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असुन या जमिनीत श्री साईबाबांच्या नित्य पुजेसाठी लागणा-या फुलझाडांची लागवड करणेबाबत संस्थानचा मानस असल्याचे सांगितले आहे.
महाशिवरात्री पर्वाचे औचित्य साधुन संस्थान मालकीचे मौजे रूई शिवारातील गट नं. ४४३/३ मधील ४०आर (०१ एकर) क्षेत्र असुन सदरचे क्षेत्र हे संस्थानचे माजी पुजारी दिलिप सुलाखे यांनी श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिलेली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाशिवरात्री पर्वाचे औचित्य साधुन संस्थान मालकीचे मौजे रूई शिवारातील गट नं. ४४३/३ मधील ४०आर (०१ एकर) क्षेत्र असुन सदरचे क्षेत्र हे संस्थानचे माजी पुजारी दिलिप सुलाखे यांनी श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिलेली आहे.या क्षेत्रात संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बेल,तुळस,रुद्राक्ष,निंबवृक्ष व नारळ इत्यादी विविध प्रकारची झाडे लावुन वृक्षारोपण करण्यात आले आहे.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे,संजय जोरी,कैलास खराडे, शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गुलाब पाटील,संस्थानचे सर्व विभागप्रमुख,कर्मचारी,माजी पुजारी दिलिप सुलाखे,रुईचे माजी सरपंच रावसाहेब देशमुख व निघोजचे भाऊसाहेब मते आदी मान्यवर उपस्थित होते.