जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगाव तालुक्यात शिवजयंती उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीत,तर ते संपूर्ण जगाला प्रेरणास्थानी असून त्यांना मॅनेजमेंट गुरू म्हणून जगात गौरवले जात असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे कार्यक्रमात बोलताना केले आहे.
१८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला.रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता.१८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली “शिवजयंती ” साजरी केली.त्यानंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला.जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता.आता देश आणि देशाबाहेर हा उत्सव साजरा होत आहे.कोपरगाव शहरात आज हा,’शिवजयंती उत्सव’ सकाळपासून मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान आज सकाळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण केला आहे.तर राष्ट्रवादीच्या वतीने सकाळी ११ वाजता जबरेश्वर मंदिरापासून मोटार सायकल फेरी आयोजित केली होती.तर प्रगत शिवाजी मंडळातर्फे गावात महिलांसह कार्यकर्त्यानी शिवाजी महाराज यांच्या पालखीसह फेरीचे आयोजन केले होते.त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण केला आहे.त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.
सदर प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेंश साबळे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,कृष्णा आढाव,नवाज कुरेशी,आव्हाटे,ऍड.संदीप कडू,राजेंद्र वाघचौरे,महिला आघाडीच्या नेत्या आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान आज सकाळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण केला आहे.तर राष्ट्रवादीच्या वतीने सकाळी ११ वाजता जबरेश्वर मंदिरापासून मोटार सायकल फेरी आयोजित केली होती.तर प्रगत शिवाजी मंडळातर्फे गावात महिलांसह कार्यकर्त्यानी शिवाजी महाराज यांच्या पालखीसह फेरीचे आयोजन केले होते.त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण केला आहे.त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भगव्या पताकांनी आसमंत भगवामय झाला असल्याचे दिसून आले आहे.शहरभर तरुणांनी आपल्या वाहनांना भगवे झेंडे लावून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण त्यांच्या समतावादी धोरणात होते.शेतकरी,गोरगरीब जनता यांच्या बाबतीत ते अत्यंत दयाळू होते.त्यांनी नेहमीच सर्व धर्मांना समान वागणूक देवून धर्मग्रंथधार्मिक स्थळे,महिलांचा सन्मान केला.पराकोटीची नैतिकता असलेले छत्रपती शिवाजी महाराज शेकडो वर्षानंतर आजही प्रत्येक देशवासीयांच्या मनामनात असल्याचे आ.काळे यांनी शेवटी संगितले आहे.
दरम्यान आ.काळे यांनी गांधीनगर,गोकुळनगरी साठे पुतळा,महाराजांना हार घालणे आदी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. तालुक्यातही विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.