जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगाव तालुक्यात शिवरात्री महोत्सव उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दोन वर्षाच्या कोरोनासाथी नंतर आज कोपरगाव शहराच्या नजीक असलेल्या कोपरगाव बेट येथील संत जनार्दन स्वामी मंदिर व कोपरगाव बेट येथील शुक्राचार्य मंदिर,मंजूर येथील सिद्धेश्वर,कुंभारी-राघवेश्वर,मोर्वीसचा मोरेश्वर,माहेगाव देशमुख-अमृतेश्वर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमासह शिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाला आहे.

माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर मंदिरात आज सकाळी कोपरगावचे आ.आशुतोष काळे व त्यांची धर्मपत्नी चैताली काळे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात.प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात,भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात.उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो.यंदा तो दि.१८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली आहे.कोपरगाव बेट येथे संत जनार्दन स्वामी मंदिर परिसर व गुरु शुक्राचार्य मंदिर आदी परिसरात हा उत्सव पुजारी व प्रशासनाचे पदाअधिकारी यांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पाडला आहे.कोपरगाव बेट येथे संत जनार्दन स्वामी यांची समाधी आहे.त्यानीच आपल्या हयातीत स्थापन केलेले श्री काशीविश्वानाथ मंदिर आहे.तर दुसरे ठिकाण प्राचीन असून या ठिकाणी कच व देवयानी यांची प्रेमकहाणी फळली-फुलली असल्याचे प्राचीन साहित्यात उल्लेख सापडतात.माणसांना जिवंत करणाऱ्या संजीवनी विद्येचे उगमस्थान मानले जाते.आजही या ठिकाणी संजीवनी पार आहे.या ठिकाणाला मोठे अध्यात्मिक महत्व असून या ठिकाणी प्राचीन काळापासून दर वर्षी शिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते.अलीकडील गेली काही वर्ष या यात्रेला उतरती कळा लागली होती मात्र ट्रस्टने मात्र या प्रश्नी लक्ष घातले असून अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आपल्या विश्वतांच्या सहाय्याने हा उत्सव आता मात्र शुक्ल पक्षातील चंद्रकलेप्रमाणे अवधीत वाढत चालला आहे.गेली दोन वर्ष कोरोनाने कहर केलेला असल्याने या वर्षी कोरोनाचे सावट या उत्सवावर नसल्याने मोठा उत्साह दिसून आला आहे.श्री क्षेत्र कुंभारी येथील राघवेश्वराचे मंदिरही त्याला अपवाद नाही.येथे प्रभू रामचंद्रांचे पादस्पर्श झाल्याचे मानले जाते.कोपरगाव तालुक्यात श्री क्षेत्र मंजूर,श्री क्षेत्र कुंभारी,मंजूर येथील सिद्धेश्वर,कुंभारी-राघवेश्वर,मोर्वीसचा मोरेश्वर,माहेगाव देशमुख-अमृतेश्वर आदी ठिकाणी हीच स्थिती होती.आज पहाटे पासून दर्शनापासून शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.तालुक्यात हा उत्सव शांततेत पार पडला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

आज कोपरगाव बेट शुक्राचार्य मंदिरात येथे आज सकाळी राजेंद्र जाधव,वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.जयंत जोशी,वासुदेव देसले,पराग संधान,महा आरती करण्यात आली असून सायंकाळी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते पालखीने गोदावरी नदीवर जाऊन शूक्राचार्य घाटावर गंगापूजन करण्यात आले आहे.तर यावर्षी गुरु शुक्रचार्य यांची प्लॅस्टर ऑफ पॅरिस मधील दोन आकर्षक मूर्ती स्थापित करण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.श्रद्धाळू आणि भाविकांना त्यांचे स्मरणासाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

याशिवाय मुंबई येथील भक्त यांनी दिलेल्या एक लाख रुपये देणगीतून सामूहिक अभिषेक हॉल विविध अगदी रंगातील स्लेट पासून सजावट करण्यात आली होती.याशिवाय पालखी जवळ केशरी कडाप्पा बसविण्यात येऊन सजावट करण्यात आली होती.दिंडी दरवाजापासून पायऱ्यांना ग्रॅनाईट बसविण्यात आले होते.मुख्य दरवाजा जवळ व्यापारी प्रसाद गाळे बांधण्यात आले होते.त्यामुळे भाविकांची व्यवस्था झालेली आढळून आली आहे.उद्या सकाळी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री क्षेत्र संवत्सर येथील शुंगेश्वर येथील मंदिर परिसरात ह.भ.प.शिवाजी महाराज भालुरकर यांची शिवमहापुराण व मार्केण्डेय पुराणावर कथा आयोजित केली होती.तर तत्पूर्वी गावात हजारो भाविक व महिला यांच्या उपस्थितीत गावात मोठी शुंगेश्वर महाराज यांच्या पालखीची गावात सडा रांगोळी काढून व ठिकठिकाणी सुवासिनींनी या पालखीस ओवाळून मिरवणूक आयोजित केली होती अशी माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.
सदर प्रसंगी राजेश परजणे यांची राज्याच्या ‘महानंद’ या राज्य सहकारी दूध संस्थेवर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी महाराज भालूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

सोमेश्वर महादेव देवस्थान येथेही शिवरात्री महोत्सव साजरा

कोपरगाव शहरातील श्रीमंत पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान येथे अ.नगरचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी महाशिवरात्रि निमित्ताने भेट देत अभिषेक,पुजा व आरती केली.त्यांचे समवेत अप्पर जिल्ह्यधिकारी सुहास मापारी हे उपस्थित होते.

श्रीमंत महामहीम पवार सरकार या राजसंस्थानचा कोपरगावनगरीत कारभार राहिला आहे.शिवकाळापासून ते पानिपत रणसंग्राम पर्यंत शौर्य गाजविणारे हे संस्थान ओळखले जाते.या संस्थानने ऐतिहासिक वाडे महादेव देवस्थानांची उभारणी आणि जिर्णोद्धार केला होता.

सदर प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,व्यवस्थापन समितीचे जयंत विसपुते, चंद्रकांत कौले,मनोज कपोते,रजनीताई ठोंबरे,कविता साळुंखे,योगिता माळवे,पौरोहित्य प्रविणशास्री मुळे, गोपिनाथशास्री जोशी,प्रशांत स्वामी जंगम,रमेश जंगम,जैन तीर्थक्षेत्र रक्षा कमिटीचे संतोष गंगवाल,नंदू शेंडे(गुरव),गोरक्षण भजनी महिला मंडळाच्या सदस्या यांचे सह सोमेश्वर महादेव भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री क्षेत्र कुंभारी येथे आज सकाळी राघवेश्वर मंदिरात श्रींचे विधिवत पूजन करण्यात आले आहे.भाविकांनी तेथेही दर्शनासाठी गर्दी केली असल्याची माहिती दिली आहे.तेथे शिवपुराणावर कीर्तन आयोजन करून उपस्थित भाविकांना सकाळपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी सात पासून राघवेश्वरानंदगिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री राघवेश्वराचे मूर्तीचे पालखीची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.दुसऱ्या दिवशी सकाळी कुस्त्यांचा हंगामा करण्यात आला असल्याची माहिती तेथील प्रतिनिधी गहिनीनाथ घुले यांनी दिली आहे.

श्री क्षेत्र मंजूर येथेही सकाळपासून मंदिरात श्रींचे विधिवत पूजन करण्यात आले आहे.भाविकांनी तेथेही दर्शनासाठी गर्दी केली असल्याची माहिती दिली आहे.तेथे शिवपुराणावर कीर्तन आयोजन करून उपस्थित भाविकांना सकाळपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

तर माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर मंदिरात आज सकाळी कोपरगावचे आ.आशुतोष काळे व त्यांची धर्मपत्नी चैताली काळे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.तेथेही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close