शैक्षणिक
माजी खा.काळे यांनी घेतले होते शिक्षणाला वाहून-भोसले

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नंतर रयत शिक्षण संस्थेला स्वत:ला वाहून घेत शिक्षणाचा प्रचार व प्रसार केल्यामुळे आज हजारो गोर,गरीब,कष्टकरी,शेकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेणे सोपे झाले आहे असल्याचे प्रतिपादन शिव व्याख्येते गणेश भोसले यांनी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सुरेगाव-कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कला,विज्ञान कनिष्ट महाविद्यालयात स्व.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आहे त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संभाजी काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण चंद्रे,स्थानिक स्कुल कमिटी सदस्य कचरु कोळपे,भाऊसाहेब लूटे,डॉ.आय.के.सय्यद,बाळासाहेब ढोमसे,प्राचार्या छाया काकडे,छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे,शिक्षक,विद्यार्थिनी,पालक संघ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कर्मवीर शंकरराव काळे यांनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार केल्यामुळे आज हजारो गोर,गरीब,कष्टकरी,शेकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेणे सोपे झाले आहे.काळे परिवाराचे पाणी प्रश्नासाठी देखील मोठे योगदान आहे.
या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे लहान गट प्रथम कु.भक्ती संदीप पवार,द्वितीय कु.वैदेही सतीश कुंभकर्ण,तृतीय संचित योगेश निर्मळ,उत्तेजनार्थ कु.सृष्टी साईनाथ चौधरी,मध्यम गट प्रथम कु.श्रुती राजेंद्र शितोळे,द्वितीय कु.क्षितिजा संदीप घोलप,द्वितीय कु.कस्तुरी योगेश सोनवणे,तृतीय कु.ईश्वरी विजय वाकचौरे,उत्तेजनार्थ कु.श्रद्धा संजय वेताळ,मोठा गट प्रथम कु.वृषाली गंगाराम घुले,द्वितीय कु.श्रेया राम शेळके,द्वितीय कु.ईश्वरी विठ्ठल निंबाळकर,तृतीय कु.सिद्धी दत्त्तात्रय दुधव व उत्तेजनार्थ कु.मानसी किरण काळे यांनी पारितोषिक पटकाविले.या सर्व विजेत्यांना आ. काळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश खंडिझोड यांनी केले.सुत्रसंचलन श्रीमती रोहिणी म्हस्के,सिद्धार्थ कांबळे यांनी केले तर आभार संजय राऊत यांनी मानले आहे.