महिला बालविकास विभाग
राज्य शासनाने एकल महिलांना विविध योजना देण्याची गरज-कोपरगावात…यांचे आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शासनाने एकल महिलांसाठी अर्थसहाय्य देऊ केले असले तरीही प्रत्यक्षात मात्र या योजनेचे लाभ विधवा स्त्रियांनाच मिळतात.बिकट आर्थिक परिस्थितीमधील या महिलांना अद्यापही वंचित रहावे लागत असून शासनाने उर्वरित महिलांना न्याय देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नेत्र तज्ञ डॉ.सोनल वाबळे यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“महिलेचा पती नसणे हा त्या महिलेचा दोष नाही,तो नसतानाही त्याच्या नावाने ती संसाराचा गाडा अविरत ओढत असताना त्यांना कुंकवापासूनच वंचित ठवणे हा त्यांच्याबाबत न्याय होणार नाही अशा रूढी,परंपरांना फाटा देणे ही काळाची गरज आहे”-संगीता मालकर,अध्यक्षा,सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान,कोपरगाव.
कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव शहरात एकल महिलांचे हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ आयोजित केला होता.त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी डॉ.दिपाली आचारी,सुधाभाभी ठोळे,गीता रासकर,छाया गिरमे,गुजराती ताई,वंदना चिकटे,स्वाती मुळे,माजी नगरसेविका वर्षा गंगुले,स्वाती काळे,अर्चना पाटील उमाताई वहाडणे,शितल पांडुरंग रायकर आदी प्रमुख मान्यवर महिलासह ग्रामीण भागातील,शहरातील,वाड्या वस्तीवरील बहुसंख्य एकल महिला या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या होत्या.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून मानसिक आरोग्य ही जपणे गरजेचे आहे.समाजात कोण काय म्हणते ? यापेक्षा मला काय महत्वाचे आहे याचा विचार करून आपले कौटुंबिक हित जपा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी केलं आहे.त्यात त्यांनी,”कोरोना काळात एकल झालेल्या किंवा अन्यकारणाने एकल असलेल्या दोन टक्के महिला सोडल्या तर उर्वरित भगिनींची परिस्थिती अत्यंत बिकट व दयनीय आहे.समाजाकडून अद्यापही या महिलांची हेळसांड होताना दिसून येते.अशा महिलांसाठी एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून या महिलांचे हळदीकुंकू व तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शेवटी नमूद केले आहे.
सदर प्रसंगी लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांनीही महिलांना मार्गदर्शन केले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना चिकटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सेवा निवृत्त शिक्षिका सुनीता ससाणे यांनी मानले आहे.