शैक्षणिक
एकावेळी पंधरा शिक्षक सेवा सोडून फरार ! कोपरगाव तालुक्यातील घटना
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहराच्या दक्षिणेस साधारण ०५ कि.मी.अंतरावर समृद्धी महामार्गांनजिक असलेल्या ‘शिक्षण प्रेमी’ नेत्याने स्थापन केलेल्या एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका वेळी मुख्याध्यापकासह सुमारे पंधरा जणांनी राजीनामा देऊन शाळेला रामराम ठोकल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे ऐन मार्च परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.त्यामुळे आपल्या पाल्यांचे काय होणार याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.
“आपल्या संस्थेबाबत कोण अफवा पसरवत आहे हे समजायला मार्ग नाही मात्र पंधरा नाहीं मात्र पाच शिक्षक आपली सेवा सोडून गेले आहे व आपण लगेच इंटरव्ह्यू घेऊन दुसरे शिक्षक भरती केले आहे त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान टळणार आहे”-आकाश नागरे,व्यवस्थापकीय संचालक,रेनबो,इंटरनॅशनल स्कूल,जेऊर कुंभारी.
पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरांवरील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून जितक्या चटकन समजते तितक्या सहजपणे अन्य भाषांतून समजणार नाही याबाबत भाषा तज्ञासह कोणाचेही दुमत होणार नाही.त्यामुळे या टप्प्यावरील शिक्षण मूलत: मातृ भाषेतूनच व्हायला हवे असे बहुतेक तज्ज्ञांचे मत आहे.तरीही इंग्रजीच्या वाढत्या महत्त्वामुळे,‘इंग्रजीवरील प्रभुत्व म्हणजे यशाची चावी’ हा समज बहुजन समाजात पसरत चालला असल्याने समाजातील अभिजन,उच्च आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पाठवत आहेत.त्यामुळे राज्यासह कोपरगाव आणि उत्तर नगर जिल्ह्यात या शाळांचे नको इतके महत्व वाढले आहे.त्यामुळे या ब भागात,’शिक्षण हब’ बनले म्हटले तर वावगे होणार नाही.त्यामुळेच या खाजगी संस्थांत खान्देश,आदिवासी नाशिक जिल्हा,मराठवाडा,मुंबई आदी परीसरातून मोठे शैक्षणिक शुल्क भरून विद्यार्थी येताना दिसत आहेत.विशेष म्हणजे या शाळांत पालकांकडून वारेमाप शुल्क घेतले जाते मात्र त्या प्रमाणात शिक्षकांना मात्र तितका पगार दिला जात नाही हे वास्तव आहे.त्यामुळे अनेक वेळा त्या शाळेत शिक्षक जास्त काळ टिकताना दिसत नाही.अधून-मधून ते सेवा बाजवत असलेली शाळा सोडून ज्या ठिकाणी जास्त वेतन मिळेल त्या ठिकाणी जाताना दिसत आहे.मात्र एखाद्या शाळेतून एकदम पंधरा शिक्षक आपली शाळा सोडून जात असेल तर ? त्या ठिकाणी नक्कीच काही तरी गडबड असल्याचे मानण्यास जागा आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्याच्या दक्षिणेस साधारण पाच कि.मी.अंतरावर समृद्धी रस्त्यालगत असलेल्या इंग्रजी शाळेत घडली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यामुळे पालकांत खळबळ उडाली आहे.
संबंधित शाळा हि माजी सहकार मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे जेष्ठ सहकारी असलेल्या नेत्याने त्यांच्यापासून फारकत घेतल्यावर काढली होती.याच स्वर्गवासी नेत्याने माजी मंत्र्यांना ग्रामीण शिक्षण संस्था काढण्यात मोलाचा वाटा उचलला होता.ते अनेक वर्ष सदर संस्था ते चालवत होते.मात्र त्यांना आपला रास्त मानसन्मान न मिळाल्याने त्यांनी त्यांचे पासून फारकत घेतली होती.व आपल्याच शेतात सदर संस्था काही वर्षापूर्वी काढली होती.सदर संस्था त्यांनी आपल्या हयातीत नावारूपालाही आणली होती यात संदेह नाही.मात्र त्यांच्या पश्चात या संस्थेचे कामकाज तितके आदरार्थी राहिले असे म्हणणे धाडसाचे ठरेल.वर्तमान स्थितीत जी घटना घडली हा त्याचा पूरावा मानला जात आहे.
दरम्यान सदर शाळेत एकूण २६ शिक्षक असल्याची माहिती प्राप्त झाली असून नवीन भरती केलेले शिक्षक पात्रता नसलेले भरले असल्याचा काही पालकांचा दावा आहे.त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
त्यामुळेच सदर ठिकाणी एका वेळी एवढ्या संख्येने शिक्षक आपली सेवा सोडून गेल्याच्या घटनेबाबत तालुका प्रभारी तालुका शिक्षणाधिकारी शबाना शेख यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”त्यांनी याबाबत आपल्याला कोणतीही माहिती उपलब्ध नसुन आज तेथील शिक्षक शालेय माहिती देण्यासाठी आले होते त्यांनी याबाबत आपल्याला काहीही अवगत केलेले नाही आपण याबाबत माहिती घेऊन आपल्याला देते”असे सांगितले आहे.