विशेष दिन
मुलांच्या कलाविष्कारातून समता इंटरनॅशनल स्कूलची उडान-प्रांताधिकारी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दिल्लीत महाराष्ट्राच्या रथातून आपल्या संस्कृतीचे दर्शन झाले असतांना कोपरगावात समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या कलाविष्कारातून भारत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन केले या उपक्रमामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी नुकतेच केले आहे.
“मुलांना मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे शैक्षणिक दृष्ट्याही अहमदनगर जिल्ह्यात समता स्कूल नावाजलेले आहे.विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने इतर शाळांनी देखील समताचा आदर्श घेऊन विविध उपक्रम आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे”-गोविंद शिंदे,प्रांताधिकारी,शिर्डी.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये उडान २०२२-२३ या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सदर प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,मुख्य कार्यवाह संदीप कोयटे,समता पतसंस्थेच्या उपाध्यक्षा श्वेता अजमेरे,संचालक अरविंद पटेल,गुलाबचंद अग्रवाल,चांगदेव शिरोडे,कांतीलाल जोशी,गुलशन होडे,सिमरन खुबानी,संजीवनी शिंदे,हर्षल जोशी आदिसंह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदींसह विद्यार्थ्यांचे पालक वर्ग,हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”समता इंटरनॅशनल स्कूल मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम आयोजित करत असते.त्या उपक्रमांमधून मुलांना कला-गुण विकसित करण्याची संधी प्राप्त करून देत असते.मुलांना मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे शैक्षणिक दृष्ट्याही अहमदनगर जिल्ह्यात समता स्कूल नावाजलेले आहे.विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने इतर शाळांनी देखील समताचा आदर्श घेऊन विविध उपक्रम आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे.
सदर प्रसंगी स्वाती कोयटे म्हणाल्या की,दरवर्षी घेत असलेल्या उपक्रमामुळे शिक्षक आणि पालक यांचे संबंध दृढ होण्यास अधिक मदत होते.या वर्षी ‘उडान’ (आजादी से बुलंदी तक) संकल्पनेच्या आधारे भारत स्वतंत्र होण्यासाठी जे देशभक्त,समाज सुधारक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७ पासून भारत देशाने सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक,राजकीय, क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणारे हे स्नेहसंमेलन आहे.तसेच समता स्कूल उभ्या असलेल्या ठिकाणी १२ वर्षांपूर्वी पिण्याचे पाणी देखील ४ कि.मी.अंतरावरून आणावे लागत असे. त्या ठिकाणी आज समताच्या व्यवस्थापनाने सेमी ऑलिंपिक साईजचा स्विमिंग पूल उभारून मुलांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टीने देखील उडान घेतली आहे.
सदर प्रसंगी सरत्या वर्षात सांस्कृतिक,क्रीडा क्षेत्रात राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय,पातळीवर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह आणि बक्षिसे देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपप्राचार्य समीर अत्तार यांनी केले तर तर सूत्रसंचालन शिर्डी येथील समता टायनी टॉट्सच्या प्राचार्य माही तोलानी यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार अदिती रावली यांनी मानले आहेत.