जाहिरात-9423439946
आंदोलन

‘ट्रॅक्टर जुगाड’ अपघातात मोठी वाढ,आंदोलनाचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगांव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट अशोशिएशन तर्फे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास अवैध डबल ट्रॉली ट्रॅक्टर मुळे होत असलेल्या अपघाताबाबत अलक्षवेध करूनही त्याची दखल न घेतल्याने या हंगामात अशा दुर्घटना घडू नये म्हणून अवैध डबल ट्राली टॅक्टरवर बंदी घालावी या प्रमुख मागणीसाठी परिवहन विभागाच्या श्रीरामपूर कार्यालयास निवेदन देऊनही कानाडोळा केल्याच्या निषेधार्थ सदर परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर आगामी ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘आत्मक्लेश आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती ट्रक चालक-मालक संघटनेने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दोन्ही प्रातिनिधिक छायाचित्र.

“रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या चिंतेचा विषय बनला असतानाच रस्ते आणि रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांतील बळी आणि जखमींची भयावह आकडेवारी उजेडात आली आहे.२०२१ मध्ये संपूर्ण वर्षभरात देशभरात मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि रेल्वे अपघातांची नोंद झाली.या अपघातांमध्ये तब्बल पावणेदोन लाखांच्या घरात मृत्यू झाले आहेत.ट्रॅक्टर जुगाड वाहतूक हि अलीकडील काळात मोठी समस्या बनली आहे.त्यातून राजकीय नेते आणि राज्याचा परिवहन विभाग कोणताही बोध घ्यायला तयार नाही याच्या निषेधार्थ श्रीरामपूर परिवहन कार्यालयासमोर ‘आत्मक्लेश आंदोलन’ होत आहे”-आयुब कच्छी,अध्यक्ष,ट्रक-चालक मालक संघटना.

देशात सुमारे ०४.२२ लाख वाहतूक अपघात झाले व त्यात १.७३ लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे.एन.सी.आर.बी.(NCRB)च्या अहवालातून भयावह आकडेवारी समोर आली आहे.त्यात पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी असून यात ते वाहतुकीसाठी अवैधरित्या ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर,जुगाड आदींचा वापर करत आहे.त्यामुळे लक्षणीय अपघात वाढले आहे.

असाच अपघात नाशिकच्या मुळाणे घाटात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गत व वर्षी जून महिन्यात घडली होती.वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात ट्रॅक्टर ट्रॉली अचानक उलटल्याने हा अपघात झाला.ज्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.याशिवाय नगर जिल्ह्यात सोनई,राहूरी,काष्ठी,संगमनेर,अशोकनगर फाटा येथे निरपराध लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान अशाच घटना राज्यात विविध ठिकाणी घडत असताना राज्याचा परिवहन विभाग राजकीय दबावातून त्याकडे सोयीस्कर रित्या कानाडोळा करत आहे.त्यामुळे अनेकांना हकनाक आपले जीव गमवावे लागत आहे.त्याबाबत सरकारने गंभीर दखल घेणे गरजेचे असताना त्याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे या अपघातातून अनेकांना आपले जिवलग गमवावे लागत आहे.या गंभीर घटनेकडे कोपरगांव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट अशोशिएशनने राज्य परिवहन विभागाचे लक्ष वेधून घेतले आहे.मात्र वारंवार निवेदने देऊनही उपयोग होत नाही हि बाब अधोरेखित होत आहे.हि गंभीर बाब आहे.त्यामुळे अपघातांना या विभागाला जबाबदार का धरू नये असा सवाल निर्माण झाला आहे.

या वारंवार घडणाऱ्या अपघाता बाबत कार्यवाही होणे गरजेचे असताना त्याबाबत चालक-मालक संघटनेने निवेदन देऊन लक्ष वेधून घेतले होते.मात्र श्रीरामपूर परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करून ठोस कार्यवाही न केल्याने सोनई,राहूरी,काष्ठी,संगमनेर,अशोकनगर फाटा येथे निरपराध लोकांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे.

‘रस्ते सुरक्षा सप्ताह’ मध्ये परिवहन अधिकारी म्हणतात अपघातात दगावलेल्या नागरीकामुळे देशाची व त्याच्या कुंटुंबाची हानी होते अशी सोयीस्कर भाषणे केली जातात पण कृती शून्य भाषणाचा काहीही उपयोग नाही. श्रीरामपूर परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी अपघात बाधित कुटुंबाची भेट घेऊन त्या कुटुंबावर काय आघात होतो याची जाणीव करुन घ्यायला हवी होती मात्र त्या पातळीवर शुकशुकाट दिसत आहे.

कोपरगाव,संगमनेर,श्रीरामपूर येथे ट्रक युनियन पदाधिकारी यांनी सामाजिक बांधलकीची जाण धरून पिडित कुंटुबाच्या वेदना दुःख जाणण्यासाठी सात्वन भेट दिली. व जिल्ह्यातील प्रत्येक पिडित कुटुंबाची भेट घेणार आहे.
तसेच निष्काळजी परिवहन कार्यालयास वेळोवेळी निवेदन दिले असून प्रसंगी आंदोलने केली आहेत.तरीही या विभागास काहीही फरक पडलेला नाही हे विशेष ! त्याच्या निषेधार्थ बुधवार दि.०१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्रीरामपूर परिवहन कार्यालया समोर, ‘आत्मक्लेश आंदोलन’ करणार आहे.या आंदोलनास ट्रक चालक-मालक संघटना सभासद व पिडित कुंटुब तसेच सुज्ञ नागरीकांनी हजर राहून आपला निषेध नोंदवावा असे आवाहन ट्रक चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष आयुब कच्छी यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close