गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे नुकतीच अज्ञात चोरट्यानीं मळेगाव थडी येथील बोरोबा रस्ता निलावाडी उभी करून ठेवलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची लाल काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर क्रं.एम.एच.१५ डी. बी.६८६३) हि दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात येवला तालुक्यातील पन्हाळा साठा येथील रहिवासी फिर्यादी शंकर धर्मा पवार यांनी दाखल केला आहे.त्यामुळे तालुक्यात दुचाकीस्वारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुचाकी चोरीची घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी हद्दीत घडली असून त्या ठिकाणी पाहुणे म्हणून आलेले येवला तालुक्यातील फिर्यादी इसम शंकर पवार यांची दि.२० जानेवारी रोजी रात्री ०९ वाजेनंतर घरासमोर उभी करुन ठेवलेली बजाज डिस्कव्हर हि वरील क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यानी पळवून नेली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात अधूनमधूनच भुरटे चोरटे आपले डोके वर काढत असून त्यांचा उपद्रव शहर आणि तालुका पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी हद्दीत घडली असून त्या ठिकाणी पाहुणे म्हणून आलेले फिर्यादी इसम शंकर पवार यांची दि.२० जानेवारी रोजी रात्री ०९ वाजेनंतर घरासमोर उभी करुन ठेवलेली बजाज डिस्कव्हर हि वरील क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यानी पळवून नेली आहे.
या प्रकरणी तातडीने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित चोरीचा गुन्हा दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व पो.हे.कॉ. सुरेश बोटे यांनीही यांनी नुकतीच भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४७/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.बोटे हे करत आहेत.