निवड
राज्य सह.दूध महासंघाच्या संचालकपदी…यांची बिनविरोध निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) संचालकपदी गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्यानिवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
श्री परजणे हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष म्हणून सद्या कार्यरत आहेत.याशिवाय अ.नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीसह अर्थ समिती,जिल्हा नियोजन समिती,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशा विविध समित्यांवर त्यांनी काम केलेले असून भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन (आनंद) गुजरात या डेअरीचे संचालक तसेच कॅनरा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत १६ संचालक आधीच बिनविरोध निवडून आलेत.त्यात उर्वरीत महाराष्ट्र विभागातून राजेश परजणे यांची बिनविरोध निवड झाली.तर पाच जागांसाठी रविवार दि.८ जानेवारी २०२३ रोजी निवडणूक पार पडली.राज्यात महासंघाचे सभासद असलेल्या सहकारी दूध संघांपैकी गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील सहकारी दूध संघ हा महासंघाला सर्वाधिक दूध पुरवठा करणारा संघ असून महासंघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये राबविलेल्या आहेत.त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,खा.डॉ.सुजय विखे आदींनी अभिनंदन केले आहे.
श्री. परजणे यांचा या पूर्वी राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या दिल्ली येथील नॅशनल एज्युकेशन अॅन्ड व्हयुमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेने सन २००५ मध्ये त्यांचा राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरव केलेला आहे. नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेनेही गोदावरी दूध संघाच्या प्रगतीत योगदान दिल्याबद्दल त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने दि. २१ मार्च २०१७ रोजी सन्मानीत केले.त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील योगाबद्दल दिल्लीच्याच इकॉनॉमिक ग्रोथ फाउंडेशन या संस्थेनेही एप्रिल २०१८ साली भारत शिक्षारत्न पुरस्काराने त्यांना सन्मानीत केले आहे.