विशेष दिन
पत्रकार एखाद्याला घडवू शकतो आणि उध्वस्तही करू शकतो-इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशात आणि परदेशात आजही पत्रकारांचे व पत्रकारितेचे महत्व अबाधित असून पत्रकार एखाद्याला घडवू शकतो आणि उध्वस्त करू शकतो असे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“कोपरगाव शहरातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन ‘पत्रकार भवना’ची मागणी करावी व पालिकेने त्यास मदत करावी,राज्यातील सर्वच राजकिय पक्ष आणि त्यांचे नेते हे केवळ तोंड देखलेपणा करत जनतेला वेड्यात काढत असून नागरिकांत दुहीची बीजे पेरत असल्याचे सांगून समाज विघटित करून आपला स्वार्थ साधत आहेत”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे.महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते म्हणून हा ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात येतो तो आज कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने वाचनालय सभागृहात आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ‘पत्रकार दिन’साजरा करण्यात आला त्या वेळी अध्यक्षस्थानारून ते बोलत होते.
दरम्यान कोपरगाव शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्या मंदिर,माधवराव आढाव माध्यमिक विद्यालय आदी ठिकाणी उपस्थित पत्रकांराचा गौरव करून ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला आहे.त्यावेळी नगरपरिषदेच्या श्वेता शिंदे,पल्लवी सूर्यवंशी,आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर.आढाव,डॉ.मेहता विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरवसे मॅडम,रयतचे समन्वयक सोनवणे सर,माधवराव जोशी,अर्चना बोराडे, प्रशांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे,राजेंद्र सोनवणे,जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे,राजेंद्र सालकर,शंकर दुपारगुडे,संजय देशपांडे,महेश जोशी,मनोज जोशी,प्रशांत टेके,शिवाजीराव गायकवाड,लक्षण वावरे,जनार्दन जगताप,फकीर टेके,योगेश डोखे,हपीज शेख,सुनील ससाणे,अनिल दीक्षित,बिपीन गायकवाड,किसन पवार,मनीष जाधव,राहुल देवरे,शैलेश शिंदे,शाम गवंडी,युसुफ रंगरेज आदी सह बहुसंख्येने पत्रकार विद्यार्थी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पत्रकार आजही जीवावर उदार होऊन पत्रकारिता करत असतो.त्यासाठी यांनी दोन वर्षांपूर्वी साथ आलेल्या कोरोनाचे उदाहरण दिले आहे.पत्रकारांनी जीव धोक्यात घालून आपली पत्रकारिता केली आहे.
“पत्रकार आणि कवी यांना पुढील काळातील दिसते असे म्हणतात ते खऱ्या अर्थाने सत्य आहे.आणि पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे,सद्सत् विवेक जागृत ठेऊन समाजातील ज्या घटकाना स्वत:चा आवाज नाही,त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत,बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं,असंही अपेक्षित असतं.म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं असे आवाहन करून त्यांनी.पत्रकारांनी लोकप्रिय समजुती धुडकावत आपल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा तटस्थपणानं करावी.त्यामुळे पत्रकार समाजातील काही घटकांच्या हितसंबंधांना धक्के देताना दिसतात.पण असे धक्के स्वीकारण्याची ज्या समाजाची मानसिकता नसते,तो समाज विकसित होऊ शकत नाही.माध्यमाने निरपेक्ष,पूर्वग्रहदुषितपणे विषय मांडू नयेत,अशीही अपेक्षा असते.त्यातून पत्रकार खरच आपलं कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतो तेव्हा व्यवस्था त्यांच्या बाजुने उभी राहील असे नाही.अनेक घटकांना सुखावताना काही घटकांची नाराजीही पत्रकारांना ओढवून घ्यावी लागते याची जाणीव त्यांनी उपस्थितांना करुन दिली आहे.त्यावेळी त्यांनी आपण नगराध्यक्ष असताना संत साहित्यिक डॉ.यू.म.पठाण यांना बोलावले होते याची आठवण करून दिली आहे.त्यावेळी त्यांना आम्ही त्यांना भेट म्हणून पेन दिला होता.त्यावेळी त्यांनी त्या प्रसंगाचे वर्णन हे ‘पेनफुल कार्यक्रम’ केला असल्याचे सांगून त्यांच्या आठवणी जागृत केल्या आहेत.व त्यांनी त्यावेळी महाराष्ट्र मुक्ती संग्रामात कामगिरी केलेल्या पत्रकार प्र.के.अत्रे,दुर्गाताई भागवत,पू.ल.देशपांडे यांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.व पत्रकारांनी बातमीत,’बाता’ कमी आणि ‘मी’नको असे थोडक्यात पत्रकारितेचे ‘सार’शेवटी कुदळे यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी विजय वहाडणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलताना म्हणाले की,”लोकशाहीवादी राजकीय व्यवस्था असणाऱ्या देशातील पत्रकारांचे जीवन सुरक्षित राहिलं नाही.युद्ध,दहशतवादी संघटनांच्या कारवायांबरोबरच हितसंबंधांच्या आड येणाऱ्या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात जीव गमवावा लागतो आहे.महाराष्ट्र सरकारनं देशात पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी कायदा मंजूर केला असल्याचे म्हटलं जाते आहे.त्यामुळे पत्रकारांना सुरक्षेचं कवच प्राप्त होईल.मात्र आजही पत्रकारांना आपल्या जीविताचे किमंत चुकवावी लागते असे सांगून पत्रकारांनी संघटित होणे गरज असल्याचे सांगून महिलाना पत्रकारितेत स्थान हवे असे सांगून त्यांनी कोपरगाव शहरातील पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन ‘पत्रकार भवना’ची मागणी करावी व पालिकेने त्यास मदत करावी अशी सूचना त्यांनी मांडली आहे.तर राज्यातील राजकिय पक्ष आणि त्यांचे नेते हे केवळ तोंड देखलेपण करत जनतेला वेड्यात काढत असून नागरिकांत दुहीची बीजे पेरत असल्याचे सांगून समाज विघटित करून आपला स्वार्थ साधतात असा आरोप त्यांनी केला आहे.राज्यातील नेते आपल्या तिजोऱ्या भरण्यात मग्न असून त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे एवढा पैसा आला कोठून असा जाहीर सवाल त्यांनी केला आहे.सदर प्रसंगी उपस्थित पत्रकांराचा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सन्मान चिन्ह,शाल,गुलाब गुच्छ देऊन सन्मान केला आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे.तर सूत्रसंचालन भावना गवांदे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार लेखाधिकारी तुषार नालकर यांनी मानले आहे.