निधन वार्ता
विजय गोऱ्हे यांना मातृशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेले सुभद्रानगर येथील रहिवासी विजय दत्तात्रय गोऱ्हे यांच्या मातोश्री प्रभावती दत्तात्रय गोरे (वय-८५) यांचे काल रात्री १० वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील गोदातीरी अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.त्यांच्या निधनाचे कोपरगाव शहरात शोककळा पसरली आहे.