गुन्हे विषयक
कट मारल्याच्या कारणावरून मारहाण,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस साधारण वीस कि.मी.अंतरावर असलेल्या धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादी व त्यांचा मुलगा सकाळी ०८ वाजेच्या सुमारास दूध घालण्यासाठी दुचाकीवर जात असताना त्याच गावातील आरोपी राहुल रघुनाथ टूपके याने त्यांना कट मारल्याच्या कारणावरून फिर्यादिस लोखंडी गजाने व लाथाबुक्यांनी मारहाण करून,”पुन्हा आमच्या नादी लागले; तर जिवंत सोडणार नाही”अशी धमकी दिली असल्याचा गुन्हा सर्जेराव चिंधा मलिक (वय-५९) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने धोत्रे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
दि.२२ डिसेंबर रोजी वरील वेळी फिर्यादी हे आपल्या मुलास घेऊन आपल्या दुचाकीवर दूध घालण्यास जात असताना त्यांच्यावर आरोपी राहुल टुपके याने दुचाकीने कट मारल्याचा आरोप केला आहे.व त्यांना अडवून शिवाजी संपतराव आगवन यांचे शेताजवळ शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण केली आहे.व “आमचे नादी लागला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सर्जेराव मलिक हे धोत्रे येथील रहिवासी असून त्यांचा शेतीचा व दुग्ध व्यवसाय आहे.ते सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या गायीचे दूध काढून ते गावातील डेअरीत घालण्यासाठी जातात.दि.२२ डिसेंबर रोजी वरील वेळी ते आपल्या मुलास घेऊन आपल्या दुचाकीवर दूध घालण्यास जात असताना त्यांच्यावर आरोपी राहुल टुपके याने दुचाकीने कट मारल्याचा आरोप केला आहे.व त्यांना अडवून शिवाजी संपतराव आगवन यांचे शेताजवळ शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण केली आहे.व “आमचे नादी लागला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे ते दोघे पितापुत्र घाबरून गेले आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी राहुल टुपके याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.५१८/२०२२भा.द.वि.कलम ३२४,३२३,४२७,५०४,५०६ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे हे करीत आहेत.