जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावात…या मागणीसाठी,’ठिय्या आंदोलन’ संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील मोठे घड्याळ,अमर भूपाळी सुरु करण्यासह रात्रीच्या भोंग्याचे गत वैभव मिळविण्यासाठी आज कोपरगाव शहर उद्धव शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांनी आपल्या समर्थकांसह कोपरगाव नगरपरिषदेसमोर ‘ठिय्या आंदोलन’ केले आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेच्या सेंट्रल गोडावून इमारतीच्या मध्यभागी एक भोंगा बसविण्यात आला होता.तो रात्री ८.३० वाजता व सकाळी ५ च्या सुमारास वाजवला जायचा त्यामुळे नगरपरिषदेचे कर्मचारी सकाळी आपले शहर स्वच्छतेचे काम सुरु करत असत.शहरात कुठे आग लागली तर वाजनारा भोंगा ऐकून नागरिक,वाहनचालक,प्रवासी गांभीर्य समजून सदर गाडीस जागा करून देत त्यामुळे पुढील अनर्थ टळत असे सदरचा भोंगा पूर्ववत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळून सुरु करावा”-भरत मोरे,माजी शहराध्यक्ष,कोपरगाव शहर उद्धव शिवसेना.

कोपरगाव शहराचे एक काळी वैभव ठरलेले जुन्या नगर परिषदेच्या इमारतीवर मोठ्या आकाराचे घड्याळ होते.मात्र सदर इमारत काही वर्षांपूर्वी नगरपरिषदेने पाडली होती.व त्या इमारतीवरील घड्याळ त्या वेळेपासून गायब आहे.सदर इमारतीच्या जागेवर आता वाचनालय इमारत उभी राहिली आहे.मात्र त्यावरील घड्याळ गायब झाले आहे.माहिती अधिकारात मागणी करूनही सदर घड्याळ सापडले नाही हे विशेष !त्या मुले सदर घड्याळ पूर्ववत सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

या शिवाय कोपरगाव नगरपरिषदेच्या सेंट्रल गोडावून इमारतीच्या मध्यभागी एक भोंगा बसविण्यात आला होता.तो रात्री ८.३० वाजता व सकाळी ५ च्या सुमारास वाजला जायचा त्यामुळे कर्तव्यावर जाणारे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर जाण्यासाठी सज्ज होत असत.नगरपरिषदेचे कर्मचारी सकाळी आपले शहर स्वच्छतेचे काम सुरु करत असत.शहरात कुठे आग लागली तर वाजनारा भोंगा ऐकून नागरिक,वाहनचालक,प्रवासी गांभीर्य समजून सदर गाडीस जागा करून देत त्यामुळे पुढील अनर्थ टळत असे सदरचा भोंगा पूर्ववत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळून सुरु करावा.
याशिवाय कोपरगाव शहरातून पवित्र गोदागौतमी नदी वाहत असून तिच्या काठी जब्रेश्वर मंदिराजवळ माजी खा.सूर्यभान पा.वहाडणे घाट असून सदर ठिकाणी नागरिकांना पवित्र गोदावरी नदीचा सहवास लाभण्यासाठी नदीकाठी सायंकाळी येत असतात.मात्र त्याठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सुविधा नाही.सदर ठिकाणी सुशोभीकरण करून खाऊ गल्ली सुरु केली तर सायंकाळी जाणाऱ्या नागरिकाना सोय होऊन तरुणांना रोजगार निर्माण होईल व शेजारी असलेल्या जिजामाता उद्यानाचे पुनर्वसन होईल असा आशावाद ‘ठिय्या आंदोलन’ कर्त्यांनी व्यक्त केला आहे.

सदर प्रसंगी भरत मोरे,सेनेचे माजी शहर प्रमुख अस्लम शेख,माजी नगरसेविका सपना मोरे,सेनेचे संपर्क प्रमुख मनोज कपोते,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बंब,मकरंद जोशी,गणेश सपकाळ,राजेश मंटाला,अमित आढाव,धरम कानकुब्जी,सागर शिंदे,दिलीप सोनवणे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,तुषार विध्वंस,मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड,निलेश गंगवाल,पप्पू इंगळे,आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close