शैक्षणिक
वर्तमानात विद्यार्थ्यांवर मूल्य संस्कार करणे काळाची गरज-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
साने गुरूजींनीं जीवनातील वास्तविक मूल्य शिकवण्यावर भर दिला.जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्याची देवता होती.त्यांनी आपल्या प्रसिद्ध कादंबरी ‘श्यामची आई’ मध्ये केलेले आहे त्यांच्या मूल्यशिक्षणाची समाजाला आजही गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“वर्तमानात मुले मुले खूपच रागीट व आक्रमक बनत चाललेली आहेत,ती का अशी बनली आहेत यावर पालकांसह सर्वांनी विचार करायला हवा आहे.तरच त्यांचे व पालकांचे पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते”-उमेश घेवरीकर,कवी.
कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या वतीने ‘मी,साने गुरुजी बोलतो’ या उपक्रमाचे अभिवाचन कवी उमेश घेवरीकर यांनी शहरातील वेगवेगळ्या शाळेतील ५००० विद्यार्थ्यांच्या पुढे केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर,शारदा इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक वाकचौरे,शुभांगी अमृतकर,माधवराव कचेश्वर आढावचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वानखेडे,सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरवसे मॅडम,श्रीमान गोकुळचंद प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्नेहा पाटणी आदीं मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कवी उमेश घेवरीकर यांनी,”शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नातं कसे असावे हे कृतीतून त्यांनी दाखवून दिले.मुले खूपच रागीट व आक्रमक बनत चाललेली आहेत,ती का अशी बनली यावर सर्वांनीच विचार करायला हवा.अभिवाचनात कवी उमेश यांनी साने गुरुजींच्या विचारधारेवर आधारित अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे केलेत.पंढरपूर मंदिराचा प्रवेश असेल,शेतकरी आंदोलन,कारागृहातील वर्णन,निसर्गाचे वर्णन,झाडावरून मृत झालेल्या चिमणीचे पिल्लू त्यामुळे झालेले दुःख विद्यार्थी लक्ष देत नाही म्हणून स्वतःच्याच हातावर मारून घेतलेल्या पट्ट्या या सर्व प्रसंगांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले आहे.
सदर प्रसंगी श्रीमान गोकुळ जनताचे विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये साने गुरुजी कथामाला शाखेचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी संगीता मालकर यांनी सर्व मुख्याध्यापकांचे व शाळेंचे आभार मानले.