दळणवळण
समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराचा शेतकऱ्यांच्या जलवाहिन्यांना उपसर्ग

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
समृद्धी महामार्गाचे कामासाठी लागणारी माती डाऊच बुद्रुक शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतीमधून उत्खनन करून वाहतूक चालू असून सदर अवजड वाहतुकीची वहाने जात असल्याने अनेक जलवाहिन्यांचे नुकसान होत आहे.शासनाने ठेकेदारांना आदेश देऊन नुकसानीचा मोबदला देण्यास सांगावे व सदर जलवाहिनी पर्यायी मार्गाने वाळवून द्याव्या अशी मागणी कोपरगाव तालुका सदर नुकसान टाळावे असे आवाहन प्रहार शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष किसान पवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रस्ते विकास महामंडळाने या महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता करून देणे आवश्यक असताना त्याची तरतूदच या मार्गात दिसत नाही.याशिवाय नैसर्गिक पाणी स्र्रोत अडवले गेल्याने त्याचा निचरा होण्याची व्यवस्था या मार्गात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.त्यामुळे आगामी काळात याची किंमत सदर महामार्गाला व महामंडळाला चुकवावी लागेल असे दिसते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते होणार आहे.नागपूर ते शिर्डी या ७०१ किमीच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून कार्यान्वित होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी दरम्यान ५२० किमीचा आहे.हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येणार आहे.दरम्यान अद्याप दुसरा टप्पा होण्यास वेळ लागणार आहे.मात्र त्या टप्प्याचे काम वेगाने सूरु आहे.मात्र कोपरगाव तालुक्यातील या उर्वरित मार्गावर काम सुरु असून त्यावर माती तथा गौण खनिज टाकण्याचे काम वेगाने सुरु आहे.ज्या शेत जमिनीतून मातीचे उत्खनन चालू आहे त्याच शेतजमिनीच्या खालून डाऊच बुद्रुक व घारी आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या गेलेल्या आहेत.या माती उत्खननामुळे सदरच्या जलवाहिन्या बाधित होणार आहेत.शेतीचा रब्बी हंगाम सुरू झालेला असून शेतकऱ्यांनी गहू,कांदे,ऊस जनावरांचा चारा आदी पिके शेतात उभी केली असून सदर पिकांना सिंचनासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे.समृद्धी महामार्गाचे ठेकेदार हे शेतकऱ्यांना त्यांच्या जलवाहिन्या स्वखर्चाने काढून घेण्याबाबत व पर्यायी मार्गाने वळविण्याबाबद दबाव टाकत आहेत.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जलवाहिन्या बाधित होणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून ते शेतकरी भयभीत झाले आहेत.हा शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा प्रश्न असून हा प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचे आहे.तरी आपण सदरच्या उत्खननात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जलवाहिन्या समृद्धी महामार्गाचे ठेकेदार यांनी त्यांचे यंत्रणेमार्फत काढून व पर्यायी मार्गाने वळवून देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच या कामाचा कुठलाही आर्थिक,मानसिक भुर्दंड शेतकऱ्यांना देऊ नये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावीत याबाबतचे निर्देश आपण त्वरित आपले स्तरावरून देण्यात यावेत अशी विनंती पवार यांनी शेवटी केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रति अ,नगर येथील जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे आदींना दिल्या आहेत.