निवड
कोपरगाव तालुक्यातील…या ग्रामपंचायतीचा एक सदस्य बिनविरोध

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रक्रिया सुरू असून अर्ज छाननीच्या दिवशी बहादरपुर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्ज दाखल केलेल्या कोल्हे गटाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला असून काळे गटाचे भाऊसाहेब कचरू रहाणे यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.
बहादरपूर ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य भाऊसाहेब रहाणे यांचे अरुण प्रभाकर रहाणे,रवींद्र कांताराम रहाणे,प्रवीण बाळासाहेब रहाणे आदींनी अभिनंदन केले आहे.असून त्यांनी काळे गटात प्रवेश केला आहे त्यांचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यातील “ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जाहीर झाल्या असून कोपरगावात २६ ग्रामपंचायतींची नामनिर्देशन भरण्याची वेळ संपून छाननी नुकतीच संपन्न झाली आहे.त्यात बहादरपूर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कोल्हे गटाच्या एका सदस्याचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे.त्यामुळे आ.काळे गटाचा भाऊसाहेब राहणे यांची निवड बिनविरोध संपन्न झाली आहे.त्याबद्दल राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आगामी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची असणारी बहादरपूर ग्रामपंचायतीची देखील निवडणूक होणार आहे.सरपंच पदासह ११ सदस्य असलेल्या बहादरपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कोल्हे गटाच्या एका सदस्याचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे.
सदर प्रसंगी माजी उपसरपंच गोपीनाथ रहाणे,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब रहाणे,सोमनाथ अशोक रहाणे,सोमनाथ निवृत्ती रहाणे,आप्पासाहेब पाडेकर,साहेबराव वामन रहाणे,रामनाथ पाडेकर,शिवाजी चंद्रभान रहाणे,बाळासाहेब रहाणे,सतीश रहाणे,दशरथ रहाणे,प्रशांत खकाळे,जगन बोरसे,कैलास रावसाहेब रहाणे,सोसायटीचे उपाध्यक्ष दत्तू खकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.