आंदोलन
नैसर्गिक आपत्ती निधी द्या अन्यथा न्यायालयात दाद मागू-…या संघटनेचा इशारा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात अतिवृष्टीने जिल्ह्यातील खरीप पिके धोक्यात आली होती त्याचे शासन आदेशानुसार त्या-त्या तालुक्यातील खरीप पिकाचे पंचनामे केले गेले असून शंभर टक्के खरीप पिकाचे ५० टक्केच्या पुढे नुकसान झाले असून बराच कालावधी झाला असूनही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही ती हेक्टरी तीस हजार रुपयांनी तातडीने द्यावी अन्यथा आपण उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागू असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.
आगामी पंधरा दिवसाच्या आत नैसर्गिक आपत्ती निवारण कायदयान्वये सन-२०१५ अंतर्गत राज्यासह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ३० हजार रुपये मदत करावी अन्यथा अ.जिल्हा शेतकरी संघटना मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्फत राज्य शासनाच्या विरोधात जनहितार्थ याचिका दाखल करून दाद मागेल-अनिल औताडे,अध्यक्ष,शेतकरी संघटना,नगर जिल्हा.
उत्पादन वाढीसाठी कितीही नियोजन केले तरी अनियमित पावसामुळे शेतकरी अयशस्वी ठरत आहे.गेल्या तीन वर्षात केवळ अवकाळी पावसामुळे तब्बल २६ लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.यावर्षीही ऐन सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच पावसाने मोठे थैमान घातले होते.त्यामुळे दोन्ही हंगामातील तसेच फळबागांचेही नुकसान झाले होते.पीक नुकसानीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या जीवनमानावरही होत आहे.कारण येत्या काळात निसर्गाच्या या लहरीपणामुळे महागाईत देखील वाढ होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.विशेष म्हणजे असा अवकाळी पाऊस हा वर्षभर कायम राहणार असल्याने पिके जोपासायची कशी हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.निसर्गाच्या लहरीपणाचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.तर याच्या व्यवस्थापनेसाठी अधिकच्या खर्चाचा भारही सहन करावा लागणार आहे.यावर्षीही सप्टेंबर आणि आक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने उत्तर नगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.त्यात कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,संगमनेर,अकोले,राहुरी आदी तालुक्याचा समावेश आहे.
दरम्यान या नुकसान भरपाईसाठी सरकारने पंचनामे करण्याचे फर्मान जाहीर केले होते.मात्र दोन महिने उलटूनही अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक दमडीही जमा झालेली नाही हे विशेष ! त्यामुळे शेतकऱ्यांत सरकारविरोधात नाराजी पसरली आहे.विद्यमान सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नंतर प्रथम क्रमाकांने शपथ विधी झाला होता.त्यांनी आपले वजन वापरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व पंधरा दिवसाच्या आत नैसर्गिक आपत्ती निवारण कायदयान्वये सन-२०१५ अंतर्गत हेक्टरी किमान ३० हजार रुपये इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रमाणे सरसकट जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा अ.जिल्हा शेतकरी संघटना मुबंई उच्चं न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्फत राज्य शासनाच्या विरोधात जनहितार्थ याचिका दाखल करील असा इशारा अनिल औताडे यांनी शेवटी दिला आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात अन्यायकारक रीतीने शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे.वास्तविक शासन कुठलेही असो लोकशाहीत प्रत्येकाने कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असते.परंतु तसे न करता सरकारच बेकायदेशीर शेतकऱ्यांची वीज तोडत आहे.शेतकऱ्यांकडे विजेचे थकबाकी वसुली पोटी विज तोडणे कायद्याने गैर आहे.शेती ग्राहकाला वीज नियमक आयोगाच्या नियमानुसार पंधरा दिवस आधी नोटीस देऊन सुचित करणे गरजेचे आहे.तसे न करता तोंडी सूचना देऊन वीज तोडली जाते.दहा महिन्यापूर्वी महाआघाडी सरकारच्या काळातही शेतकऱ्यांची वीज तोडली म्हणून पंढरपूर येथे तरुण शेतकऱ्यांच्या मुलांनी आपला व्हिडिओ काढून आत्महत्या केली.आजही अकोळनेर तालुका नगर येथील एम.ए.बी.पी.एड.असलेल्या पोपट जाधव या शेतकऱ्यांने शेतीची वीज तोडली म्हणून आपली जीवन यात्रा झाडाला गळफास घेऊन संपवली.खरिपात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती कायद्याने हक्काची मदत न देता बेकायदेशीर विज बिल वसुली चालु आहे.शेतकऱ्यांना आवाहन आहे की,”शेतकऱ्यांनी वीज,बँकेचे कर्ज आदी शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या बाबीवरून आत्महत्या करू नये असे आवाहन केले आहे.
दरम्यान संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा आम्ही आपणास नक्कीच मदत करू,आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याने उचलु नये असे आवाहन शेवटी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर,पशुवैद्यकीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर आदिक,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर नवले शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप,युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बच्चू मोढवे,तालुकाध्यक्ष नारायण टेकाळे,राहुरी तालुकाध्यक्ष योगेश मोरे,राहाता तालुकाध्यक्ष त्रिंबक भात,कर्जत तालुकाध्यक्ष रणजीत सुल,गोविंदराव वाघ,जेष्ठ मार्गदर्शक सुदामराव औताडे,श्रीरामपूर युवा आघाडीचे शरद आसने,इंद्रभान चोरमल, कडू पवार,नारायण पवार,साहेबराव चोरमाल,अकबर शेख,शरद पवार,बबन उघडे,ज्ञानेश्वर आदिक,ऍड.घोडे,ऍड.मोहन,अशोक टेकाळे वसंत वमने,मनोज औताडे,आदी कार्यकर्त्यांनी शेवटी केले आहे.