गुन्हे विषयक
स्थानिक गुन्हे शाखेचा कोपरगावात मोठा छापा,२८ जुगारी जेरबंद,२३.३५ लाखांचा ऐवज जप्त !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आज सकाळी अ.नगर गुन्हे शाखेने टाकळी नाका,धोंडीबानगर येथे केलेल्या मोठ्या कारवाईत तिरट खेळणाऱ्या व नगर,नाशिक,औरंगाबाद या तीन जिल्ह्यातून आलेल्या सुमारे २८ जुगाऱ्यांना पोलिसानी रंगेहात जुगार खेळताना पकडले असून यातील रोख रक्कम २ लाख ०५ हजार ६७० तर विविध कंपनीचे ३० भ्रमण ध्वनी व १९ लाख ४० हजार रुपयांची चारचाकी वहाने अशी एकूण २३ लाख ३५ हजार ३७० रुपयांचा ऐवज जप्त केल्याने कोपरगाव शहर आणि परिसरातील अवैध व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे.
दरम्यान विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार आज सकाळी झालेली कारवाई हि व गत सप्ताहात झालेली गुटखा कारवाई या दोन्ही मोठ्या कारवाई या नगर येथील स्थानिक गुन्हे शाखा यांनीच केली असल्याचे समजते.असे असेल तर हि स्थानिक शहर पोलिसांची मोठी नाचक्की मानली जाणार असल्याची चर्चा शहरातील नागरिकांत दबक्या आवाजात सुरु आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर आणि परिसरात अलीकडील काळात अवैध व्यवसाय वाढला असल्याचे आढळून येत आहे.त्यामुळे नगर स्थानिक गुन्हे शाखेची या शहर आणि परिसरात वक्रदृष्टी झाली असून या शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त खबरीनुसार त्यांनी केलेल्या कारवाईत तीन आरोपी व गुटख्याच्या दोन गाड्या जप्त केल्या होत्या.यातील २.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.त्यात एक मारुती ओमनी गाडी व मारुती वॅगणार अशांचा समावेश होता.त्याच दिवशी पहाटे निवारा परिसरात सलग तीन चोऱ्या आणि एक चोरीचा प्रयत्न झाला होता.त्यानंतर एक मारुती एर्टीगा आणि एक स्विफ्ट अशी दोन चार चाकी वहाने चोरट्यांनी लांबवले होते.अन्य दुचाकी वाहनाच्या चोऱ्या अलग आहे.त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच आज पुन्हा आठ दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून स्थानिक पोलिस प्रशासनास धक्का दिला असल्याचे मानले जात आहे.
याबाबत मिळालेल्या पोलिसी माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गुप्त बतमीदारामार्फत मिळलेल्या माहितीनुसार त्यांनी कारवाई करून खडकी नाका परिसरात गणेश बन्सी मोरे यांचे याचे इमारतीचे छतावर मोठा जुगार सुरु असून या ठिकाणी नजीकच्या शहरातून जुगारी खेळण्यास येत असल्याची माहिती मिळाली होती.व यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत त्यांना खडकी नाका येथील धोंडीबानगर येथे बंगल्याच्या छतावर त्यांना गोलाकार बसलेले काही इसम आढळून आले होते.प्रत्येकाच्या हातात तीन पत्ते आढळून आले होते.पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेखलाल शेख चाँद (वय-५७) रा.चर्च रोड,शीतल सुभाष लोहाडे, (वय-४५) विजय केदु निमसे (वय-४५),नंदू पूजा नजन (वय-३६)रा.बनरोड राहाता.इम्रान याकूब मोमीन (वय-३९) रा.जमदाडे चौक मनमाड,जि.नाशिक,कलीम भिकन बागवान (वय-६७) रा.इंदिरानगर,मोबाईल आश्पाक जमील (वय-४७) शांतीनगर मनमाड,नितीन उत्तम शेजवळ,(वय-३६),राजवाडा लासलगाव,राहुल दिलीप पराशेर (वय-३४) रा.मनमाड,नाना शाबा डोळस (वय-६३)रा.सुभाषनगर,शेख अहमद हाशम,(वय-३८) खडकी,सुरेख कुंडलिक सातभाई (वय-५६) रा.येवला,गणेश विठ्ठल जेजूरकर (वय-३१) पानमळा,शिर्डी,सोमनाथ बापू वाळके (वय-४२) लासलगाव ता.निफाड,अनिल देवराम खरात (वय-४६) लासलगाव ब्राम्हणगाव,ता.निफाड,योगेश मुकुंद रासकर,(वय-३४) रा.येवला,दीपक रामदास उंबरे (वय-४६) रा.येवला,कैलास अशोक मंजुळ रा.महादेव नगर,तुषार राजेंद्र दुशिंग,टिळकनगर,मोहसीन कलंदर सय्यद (वय-३२) रा.सराला,ता.वैजापूर,जि.औरंगाबाद,दीपक मायकल बनसोडे,(वय-३०)रा.स्वामीसमर्थ नगर,वैजापूर,रवींद्र माधव सानप (वय-३६) रा.येवला रोड कोपरगाव,हरीलाल फकिरा डांचे (वय-५६)रा.संगमेश्वर मालेगाव जि. नाशिक,सुदाम पंढरीनाथ नवले (वय-४४) रा.तांभोळ ता.अकोले,सुभाष लक्ष्मण चावडे, (वय-३८),हरी दगडू करवर,(वय-४२) दोघे रा.बाभुळवंडी ता.अकोले,वीरेंद्र अरुणसिंग परदेशी (वय-४५) रा.येवला,युनूस इक्बाल शेख (वय-३६) रा.खडकी,ता.कोपरगाव आदींचा समावेश आहे.
दरम्यान त्यांचेकडून रोख रक्कम २ लाख ०५ हजार ६७० तर विविध कंपनीचे ३० भ्रमणध्वनी व १९ लाख ४० हजार रुपयांची ४ चारचाकी वहाने अशी एकूण २३ लाख ३५ हजार ३७० रुपयांचा ऐवज जप्त केली आहे.
दरम्यान या वाहनात क्रेटा कार (क्रं.एम.एच.१२ क्यु.एफ.१५५३) तवेरा कार (क्रं.एम.एच.१३ ए.एच.४४४४),स्कोडा ऍक्टिव्हिया कार क्रं.(एम.एच.०३,ए. एम.६७८२),अल्टो कार (क्रं.एम.एच.४१ बी.ए.८३६७) व ७ दुचाकी वहाने व पत्ते असे एकूण २३ लाख ३५ हजार ३७० रुपयांचा अवैज पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके,पो.नीं.वासुदेव देसले,सहाय्यक पो.नीं.डी. एस.मुंढे,पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे,सोपान गोरे,सहाय्यक फौजदार व्ही.जे.घोडेचोर,पो.ह.बी.आर.फोलाने,पो.ना.एस.एस.चौधरी,बी.के.खरसे,एल.सी.खोकले,आर.पी.जाधव,वाय.ए.सातपुते,पोलीस वाहन चालक यू.एम.गावडे,सी.पी.कुसाळकर,के.एल.कुऱ्हे,पो.कॉ.राम खारतोडे,गणेश काकडे आदींचा सहभाग असल्याची माहिती पोलिसी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
सदर गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३९७/२०२२ म.जु.कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.