गुन्हे विषयक
चोरट्यांचा कहर सुरूच,कोपरगाव शहरात दोन कार चोरीस!
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली असून निवारा परिसरात नुकत्याच तीन चोऱ्या आणि एक चोरीचा प्रयत्न उघड झालेला असताना आज पुन्हा किरण दत्तात्रय जाधव यांची सुमारे ५ लाखांची मारुती एर्टीगा व विश्वजित भास्कर कोकाटे यांची मारुती स्विफ्ट कार अशा दोन चार चाकी वाहनांच्या चोऱ्या उघड झाल्याने शहरातील वाहन धारकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात नगर जिल्हा गुन्हे शाखेने शहरात येऊन भल्या पहाटे मोठा छापा टाकून दोन चार चाकी वहानासह सुमारे सहा लाखांचा ऐवज जप्त व तीन जणांना अटक केली होती.यासह शहरात तीन चोऱ्या व एक चोरीचा प्रयत्न अशा गंभीर चार चोरीच्या बातम्या येऊन त्याची शाई वाळली नसताना आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनगर येथील लाकडी कारागिरीचे काम करणारे फिर्यादी किरण दत्तात्रय जाधव व विश्वजित कोकाटे यांची स्विफ्ट कार अशा दोन कार चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात अधूनमधूनच भुरटे चोरटे आपले डोके वर काढत असून त्यांचा उपद्रव शहर पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या निवारा हद्दीत घडली असून त्या ठिकाणी
द्वारकानाथ पन्नालाल मुंदडा यांच्या घराचा कोयंडा तोडून घराच्या आत कपाटाचे कुलुप तोडून त्यातील चांदीचा गणपती व अन्य चीजवस्तू असा ५०-६० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.त्यात रोख ७-८ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.त्या नंतर रोहित पटेल यांची होंडा कंपनीची ८० हजार रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी लंपास केली आहे या शिवाय ओमनगर येथे मधुकर कांबळे यांचे ६६ हजार रुपये किमतीचे साधारण २ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले गेले आहे.
या शिवाय ओमनगर येथे मधुकर लक्ष्मण कांबळे साधारण ६६ हजार रुपये किमतीचे २ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले गेले आहे या नंतर आंबेटकर गुरुजी यांच्या घरी चोरीचा अनेक ठिकाणी चोऱ्यांचे अयशस्वी प्रयत्न केल्याच्या बातम्या येऊन व शहरात नगर जिल्हा गुन्हे शाखेने शहरात येऊन भल्या पहाटे मोठा छापा टाकून दोन चार चाकी वहानासह सुमारे सहा लाखांचा ऐवज जप्त व तीन जणांना अटक केली होती.या गंभीर चार चोरीच्या बातम्या येऊन त्याची शाई वाळली नसताना आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनगर येथील लाकडी कारागिरीचे काम करणारे फिर्यादी किरण दत्तात्रय जाधव (वय-३९) यांची नजीकच्या पटांगणात उभी करून ठेवलेली सुमारे ५ लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची मारुती एर्टीगा (क्रं.एम.एच.१७ ए.झेड.९६६०)ही अज्ञात चोरट्याने बनावट चावीचा प्रयोग करून मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केली असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३८१/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.
तर दुसऱ्या एका घटनेत विश्वजीत भास्कर कोकाटे यांची ४.५० लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट क्रं. एम.एच.१७ ए.जे.४४९४) ही दिनांक १८ नोव्हेंबर रोजी जगदीश अपार्टमेंट धारणगाव रोड कोपरगाव येथून रात्री चोरीला गेली आहे.
या घटनेचा गुन्हा स्वतंत्र दाखल झाला असून त्याचा क्रं.३७८/२०२२ भा.द.वि.कलम.३७९ असा आहे.त्याचा तपास पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते व पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.