निवड
बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्रीपदी दळवी यांची नियुक्ती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे केंद्रीय आखिल भारतीय हिंदू संमेलन पटीयालामधे डॉ.प्रविण तोगड़िया यांच्या उपस्थितित संपन्न झाले असून त्यात कोपरगांव येथील कृष्णा दळवी यांची पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाने त्यांच्यावर संघटनेचा विकास व विस्तार करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल विशाल बिडवे,निशाद दावे,अशोक नाईकवाडे,रोहित उमुगणे,केदार चोपडे,दिनेश खडांगळे,आकाश वरदऴ,रोहन जोशी,विलास गोंदकर,मुन्ना माडीवाले,सोनु सूर्यवंशी,सुनील फंड,प्रसाद नरोडे,सुरेश जाधव,दिलीप सारंगधर,ईश्वर साटोटे आदींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.