निवडणूक
पदवीधर मतदार संघासाठी एकदाच नाव नोंदणी करा-…या नेत्याचे आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गेली चाळीस वर्षापासून पदवीधर मतदार संघासाठी प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत सातत्याने प्रत्येक वेळी पदवीधरांना नाव नोंदणीची वेळ येते ही बाब लोकशाहीला घातक असून घराणेशाहीला पोषक आहे.पदवीधर तरुणांनी या निवडणुक पूर्व आपली नावे नोंदण्याचे काम करावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केले आहे.
“एकदा त्या पदवीधर व्यक्तीने आपली नाव नोंदणी केली तर त्यास तह्यात मतदार यादीत समावेश करून घेतला पाहिजे.परंतु तसें न होता या मतदार संघासाठी प्रत्येक निवणुकीत नव्याने नाव नोंदणी करून नविन मतदार यादी तयार केली जाते.यामागे राज्यातील नेत्यांचा व विविध सत्ताधारी पक्षाचा कुटील डाव आहे.बाजार समितीत जसे शेतकऱ्यांना डावलले तसाच प्रकार येथे वर्षानुवर्षे सुरु आहे हे बंद व्हायला हवे”-अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना.
सर्व पदवीधर,पदविकाधारकांनी पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी आपले नाव १८ क्रमांकाचा अर्ज भरून मतदार यादीत नोंदविणे आवश्यक आहे.नाशिक विभागीय आयुक्त हे नाशिक पदवीधर मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी आहेत.त्यामुळे मतदारांनी त्यांच्या कार्यालयात मतदार नोंदणीचा अर्ज जमा करावा.पहिल्या यादीत शेतकरी वर्गातील बहुतांश पदवीधरांची नावे नसल्याने त्यांनी आता ७ नोव्हेंबर पर्यंत आपली नावे नोंदवावी असे आवाहन केले आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि.२३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर हा आहे.दिनांक २५ डिसेंबर रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील आणि अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांनी काही दिवसापूर्वी दिली आहे.
तथापि राज्यातील कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी घेतल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव सदर विद्यापीठाने थेट निवडणूक आयोगाकडे कळवून त्या पदवीधरांचा समावेश मतदार यादीत करून घेणे गरजेचे आहे.किंवा एकदा त्या पदवीधर व्यक्तीने आपली नाव नोंदणी केली तर त्यास तह्यात मतदार यादीत समावेश करून घेतला पाहिजे.परंतु तसें न होता या मतदार संघासाठी प्रत्येक निवणुकीत नव्याने नाव नोंदणी करून नविन मतदार यादी तयार केली जाते.यामागे राज्यातील नेत्यांचा व विविध सत्ताधारी पक्षाचा कुटील डाव आहे.बाजार समितीत जसे शेतकऱ्यांना डावलले तसाच प्रकार येथे वर्षानुवर्षे सुरु आहे.या बाबत कोणीही आवाज उठवत नाही विशेष ! कारण यातच त्यांचे राजकीय हित दडलेलं आहे.या मध्ये प्रामुख्याने सरकारी कर्मचारी अधिकारी व शिक्षक हेच मतदार म्हणून प्रत्येक निवडणुकीत नाव नोंदणी करतात.सदर मतदारावर सातत्याने शासनाचे पदाधिकारी व शिक्षण संस्था विश्वस्त यांचाच प्रभाव असल्याने सातत्याने राजकीय घराणेशाहीतील लोक निवडून येतात.आज राज्यात शेतकरी पदवीधर जास्त संख्येने असून सुद्धा मतदार यादीत नाव नोंदणी न केल्यामुळे पदवीधर मतदार संघासाठी मतदान करता येत नाही.त्यामुळे या पदवीधर निवडणुकीसाठी विधान सभेत शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी जास्तीत जास्त पदवीधर शेतकऱ्यांनी मतदार नोंदणी अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन अ.नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने अनिल औताडे यांनी शेवटी केले आहे.