कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरातील रेंगाळलेली कामे तातडीने पूर्ण करा-सूचना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून रेंगाळलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा व कामांना वेग द्या कारणे देवू नका अशी तंबी आ.आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना नूकतीच दिली आहे.
कोपरगाव शहरात सुरू असलेल्या विकास कामांची आ.काळे यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत पाहणी केली.यावेळी त्यांनी सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेवून रेंगाळलेल्या विकास कामांबाबत सूचना दिल्या आहेत.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,रमेश गवळी,फकीर कुरेशी,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,सचिन परदेशी,राजेंद्र खैरनार,अशोक आव्हाटे,बाळासाहेब रुईकर,संदीप कपिले,धनंजय कहार,आकाश डागा,महेश उदावंत,राजेंद्र आभाळे,इम्तियाज अत्तार,हारुण शेख,विजय दाभाडे,बाळासाहेब शिंदे,सचिन गवारे,मनोज नरोडे,राजेंद्र जोशी,विलास आव्हाड,राहुल आव्हाड,विशाल राऊत,ऋतुराज काळे,उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,ठेकेदार समीर गवळी,बंडू आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
कोपरगाव शहरातील अमरधामसाठी दिलेल्या एक कोटी निधी,मोहनिराज नगरच्या स्मशानभूमी साठी दिलेला ५० लाख रुपये निधी तसेच १३१ कोटी रुपये निधीतून सुरू असलेल्या कोपरगाव बेट भागातील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी त्यांनी यावेळी केली व निर्धारित वेळेत चांगल्या दर्जाची विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत.