गुन्हे विषयक
कोपरगावात सराफास गंडा,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित सराफ संजय शंकर भडकवाडे (वय-४९) रा.सुभद्रानगर यांस तुळजाभवानी मंदिरानजिक असलेल्या आत्मा मलिक नावाच्या दुकानात सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी महिलांनी सुमारे ५० हजार किमतीचे सोन्याचे मिनी गंठन लंपास केले आहे.त्यामुळे सराफ बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर सराफ दुकानात ठिकाणी दोन महिला आल्या व त्यांनी,”आपल्या सोन्याचे गंठन घ्यावयाचे आहे” अशी बतावणी करून सराफ दुकानात प्रवेश केला होता.व “सोन्याचे पॅडल दाखवा”,”पोत दाखवा,पळ्या दाखवा” असे म्हणून त्यांनी दुकानदारास गुंतवून ठेवले व त्यांचे लक्ष इतरत्र गेल्याची संधी साधत दाखवलेल्या मालातून एक तोळ्याची सोन्याचे गंठन हातोहात साफ केले आहे.
वर्तमानात सोन्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करण्यास ग्राहकांची मोठी गर्दी असून देशभरात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्या गर्दीचा चोरटे फायदा उठवताना दिसत असून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात तुळजा भवानी व्यापारी संकुलात असलेल्या आत्मा मालिक नावाचे दुकानात काल सायंकाळच्या ६.२५ वाजेच्या सुमारास घडली आहे.सदर ठिकाणी दोन महिला आल्या व त्यांनी,”आपल्या सोन्याचे गंठन घ्यावयाचे आहे” अशी बतावणी करून सराफ दुकानात प्रवेश केला होता.व “सोन्याचे पॅडल दाखवा”,”पोत दाखवा,पळ्या दाखवा” असे म्हणून त्यांनी दुकानदारास गुंतवून ठेवले व त्यांचे लक्ष इतरत्र गेल्याची संधी साधत दाखवलेल्या मालातून एक तोळ्याची सोन्याचे गंठन हातोहात साफ केले आहे.
सदर महिला आपले उद्दिष्ट साध्य झाल्यावर त्या ठिकाणाहून निघून गेल्यावर फिर्यादीने आपले डाग मोजून पहिले असता त्यात त्यांना आपले अठरा कॅरेटचे १० ग्रॅमचे एक ५० हजाराचे सोन्याचे गंठन आढळले नाही त्यावेळी त्यांनी शोधाशोध करून पाहिली असता त्यांना यश आले नाही.अखेर त्यांनी आपल्या दुकानातून सदर महिलांनीं सदर डाग लंपास केला असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी सदर महिलांना आजूबाजूस शोधून पहिले असता त्या नजीक आढळून आल्या नाही.अखेर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सदर घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे.सदरच्या चोरीची घटना तेथील चलचित्रण सुरु असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.त्यावरून फिर्यादीची चोरी झाल्याची खात्री झाली आहे.सदर महिला या कोपरगाव तालुक्या बाहेरील असल्याचे मानले जात आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दोन चोरट्या महिला विरुद्ध गुन्हा क्रं.३३२/२०२२ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले याचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.