न्यायिक वृत्त
राज्यातील शेतकऱ्यांना…या कर्ज योजनेचा लाभ द्या-उच्च न्यायालयाचा आदेश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना-२०१७ मधील पात्र सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
“केवळ शासनाने पोर्टल बंद केल्यामुळे सदर अर्जदार हे योजनेस पात्र असून देखील व ते पात्र असल्याचे पुरावे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.तसेच केवळ पोर्टल बंद असल्याकारणाने ते कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहिले व त्याचा परिणाम त्यांना नविन कर्ज घेणे दुरापास्त झाले आहे त्यामुळे या कर्ज माफीला ते पात्र ठरत असून राज्यातील अनेक शेतकरी त्यासाठी पात्र आहेत”-अड्.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील रहिवासी असलेले शेतकरी भाऊसाहेब बजरंग पारखे व इतर शेतकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना-२०१७ मध्ये पात्र असून देखील केवळ त्यांची नावे हरीत यादीत (ग्रीन लिस्ट) न आल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता.त्यामुळे त्यांनी सदर जनहित याचिका दाखल केली असता वरील आदेश देण्यात आले आहेत.
सविस्तरचे सविस्तर वृत असे कि,”महाराष्ट्र शासनाने दि.२८ जून २०१७ रोजी,”छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना” अंमलात आणून सदर योजनेप्रमाणे दि.३० जून २०१६ रोजी थकीत असलेले मु्द्दल व त्यावरील व्याजासह रु.१.५० लक्ष मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सदर कर्ज माफी बाबतच्या योजनेच्या संबंधित लाभधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या.त्यातील शेतकरी भाऊसाहेब बजरंग पारखे व कांतीबाई हळनोर (मयत) तर्फे वारस साहेबराव हळनोर यांनी श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादीत खिर्डी या संस्थेकडून पीक कर्ज व संकरीत गाईसाठी कर्ज घेतले होते.सदरचे कर्ज हे या योजनेनुसार पात्र ठरत असल्या कारणाने संस्थेने जिल्हा बँकेमार्फत योजनेच्या निकषाप्रमाणे शासनाच्या पोर्टलवर अपलोड केले होते.असे असून देखील त्यांची नावे हरित यादीत मध्ये न आल्यामुळे व सदरचे पोर्टल बंद असल्यामुळे त्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नव्हता.त्यासाठी त्यांनी अहमदनगर जिल्हा बँक,जिल्हा निबंधक कार्यालय,अ.नगर तसेच विविध ठिकाणी विनंती करुन सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पाठपुरावा केला.परंतु केवळ शासकीय पोर्टल बंद झाल्यामुळे व त्यांची नावे ग्रिन लिस्टमध्ये न आल्यामुळे संबंधीत अधिकाऱ्यांनी लाभ देता येत नसल्याचे त्यांना कळविले होते.त्यांच्या जमिनीवर असलेल्या कर्ज बोजामुळे त्यांना नविन कर्ज घेणे अडचणीचे व जिकरीचे झाले होते. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात येथे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचेमार्फत जनहित याचिका दाखल केली होती.
सदर याचिकेची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यात ॲड.अजित काळे यांनी उच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की,”केवळ शासनाने पोर्टल बंद केल्यामुळे सदर अर्जदार हे योजनेस पात्र असून देखील व ते पात्र असल्याचे पुरावे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.तसेच केवळ पोर्टल बंद असल्याकारणाने ते कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहिले व त्याचा परिणाम त्यांना नविन कर्ज घेणे दुरापास्त झाले आहे.हा युक्तीवाद उच्च न्यायालयाने मान्य करुन राज्यस्तरीय समितीने त्यांचे नांव हरित यादीमध्ये टाकून त्यांना या योजनेचा लाभ दि.३० ऑक्टोबरच्या आत द्यावा असा हुकूम केला आहे.
सदर याचिकेची सुनावणी होत असतांना अशा स्वरुपाचे पात्र शेतकरी मोठया प्रमाणात असल्याचे ॲङ अजित काळे यांनी न्यायालयाचेन निदर्शनास आणले आहे.त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळावा म्हणून महत्वपूर्ण मागणी केली व अशा शेतकऱ्यांना कोर्टात येण्याची गरज पडू नये म्हणून हा निकाल अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा असा युक्तीवाद केला असता त्यास सरकारी अभियोक्ता ॲङ कार्लिकर यांनी देखील सहमती दर्शविली आहे.असे लाभाधारक शेतकरी राज्यात असण्याची व्यक्त केलेली शक्यतेस ॲङ कार्लिकर यांनी दुजोरा दिला होता.त्यामुळे उच्च न्यायालयाने अशा सर्व शेतकऱ्यांना सदर निकालाच्या आधारे प्रकरणाची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा असा हुकूम केला आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना-२०१७ मधील पात्र सर्व शेतकऱ्यांना वरील निर्णयामुळे फायदा होणार असल्याचे ॲड.काळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान या याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲङ अजित काळे यांनी काम पहिले आहे.त्यांना ॲङ साक्षी काळे व ॲङ प्रतिक तलवार आदींनी सहकार्य केले आहे.अड्.काळे यांच्या या प्रयत्नाबद्दल शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,कार्याध्यक्ष , क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,संघटक रुपेंद्र काले,सचिव शिवाजी जवरे,युवराज जगताप आदींसह त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.