गुन्हे विषयक
…’ती’आत्महत्या नव्हे,कोपरगावात चार जणांविरुद्ध गुन्हा,तीन अटक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी ज्योती देविदास पगारे (वय-३४) ही विवाहित महिला आपल्या राहत्या घराच्या छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत मयत अवस्थेत आढळून आली होती त्यात सादर महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे निष्पन्न झाल्याने नवऱ्यासह दीर,जावं,सासू,आदी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे त्यामुळे टाकळीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मयत महिला ज्योती देविदास पगारे हिचे छायाचित्र.
या घटनेतील आरोपी व फिर्यादी महिलेच्या नवऱ्याचा व मयत महिलेचा घर बांधणीच्या हिस्स्या वाटपावरुन व ७० हजार रुपयांच्या रकमेवरून आपापसात वाद होता असे समजते आहे.त्यातून संतोष पगारे नवरा देविदास पगारे यांनी तिला मारहाण केली होती.त्याबाबत तिने आपल्या भाऊ संतोष पवार यास भ्रमणध्वनी करून कळवले होते.व आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसऍप वर लघु संदेश पाठवून आत्महत्या करतअसल्याचे कळवले होते.त्या नंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते.त्यानंतर हि बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ज्योती देविदास पगारे ही सध्या टाकळी गावात राहत असलेल्या घरातील छताच्या पंख्याला गळफास घतलेल्या स्थितीत आढळून आली होती.सदर महिलेचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर सदर घटना उघडकीस आली होती.हि घटना उघड झाल्यावर कोपरगाव शहर पोलिसांना स्थानिक नातेवाईक व ग्रामस्थानी कळविले होते.पोलिस निरिक्षक वासुदेव देसले व पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी घटनास्थळी पंचनामा करत सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.त्या नंतर सदर शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून सदर महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
दरम्यान त्यानंतर मयत महिलेचा भाऊ फिर्यादी संतोष निंबा पगारे (वय-४२) यांनी मयत महिलेचा आरोपी दीर संतोष पगारे,जावं सुरेखा पगारे,नवरा देविदास पगारे,सासू हिराबाई पगारे यांचे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा क्रं.३१५/२०२२ भा.द.वि.कलम ३०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या घटनेतील आरोपी व फिर्यादी महिलेच्या नवऱ्याचा व मयत महिलेचा घर बांधणीच्या हिस्स्या वाटपावरुन व ७० हजार रुपयांच्या रकमेवरून आपापसात वाद होता असे समजते आहे.त्यातून संतोष पगारे नवरा देविदास पगारे यांनी तिला मारहाण केली होती.त्याबाबत तिने आपल्या भाऊ संतोष पवार यास भ्रमणध्वनी करून कळवले होते.व आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसऍप वर लघु संदेश पाठवून आत्महत्या करत असल्याचे कळवले होते.त्या नंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते.त्यानंतर हि बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.हि माहिती कोपरगाव शहर पोलीस सूत्रांनी संबंधितांनी दिली आहे.
यातील आरोपी दीर संतोष पगारे,आरोपी नवरा देविदास पगारे,जावं सुरेख पगारे आदी आरोपीना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देसले यांनी दिली आहे.त्यांना कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधीकारी भगवान पंडित याचे समोर हजर केले असता यातील नवरा व दीर या दोन आरोपीना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.यातील आरोपी जाऊबाई सुरेखा पगारे हिस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तर यातील आरोपी सासू अद्याप अटक नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान यात आरोपींच्या वतीने अड्.एम.यू.सय्यद यांनी काम पहिले तर सरकारी पक्षाचे वतीने अभीयोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी काम पाहिले आहे.