कला व सांस्कृतिक विभाग
कविता देहाला,मनाला चैतन्यमय करते-पो.उ.नि.ठोंबरे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कविची कविता थकलेल्या शरीराला,शिणलेल्या मनात चैतन्य निर्माण करते.कविता देहाला मनाला टवटवीत करते.कवि कुसुमाग्रज यांची, ‘कणा’ हि कविता लढण्यासाठी बळ देते असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगावातील या कवि संमेलनाचा शुभारंभ संतोष तांदळे यांनी केला.चारोळ्या,वात्रटिका,विनोद सादरीकरण केले.कवि राजेंद्र कोयटे यांनी आपल्या शैलीत राजकीय वृत्तीचे चिंतन कवितेत मांडले.जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.तानाजी पाटील यांनी माणूस,माती,झाड यातील एकनिष्ठता व्यक्त केली.वृत्तपत्र छायाचित्रकार,साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी कोरोना महामारीतील आठवणी जाग्या केल्या.ग्रामीण कवि बाळासाहेब देवकर यांनी शेती शेतकरी यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोपरगाव शाखेंच्या वतीने कोपरगाव येथील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीने ‘कोजागिरी पौर्णिमे’च्या निमित्ताने कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवि जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.ता.रा.पाटील हे होते.
सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हिरालाल महानुभाव,कवि राजेंद्र कोयटे,चारोळी कार,चित्रकार संतोष तांदळे,कवयित्री माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई,प्रा.संजय दवंगे होते.
सदर प्रसंगी उपस्थितांचे स्वागत प्रा.संजय दवंगे यांनी केले आहे.तर प्रास्ताविक हिरालाल महानुभाव यांनी केले आहे.या वेळी कोपरगाव शहर तालुक्यातील साहित्य संमेलनाचा आढावा घेतला गेला.सन-२००५ चे अविस्मरणीय तिनदिवशीय संमेलन,स्मरणिकेची आठवण मन मोहवून गेली.
प्रमोद येवले यांनी आशयसंपन्न भावपूर्ण कविता सादर केली.ऐश्वर्या सातभाई यांनीही राजकीय, सामाजिक आशयाची कविता सादर करताना रसिकांना मंत्रमुग्ध केले.श्रद्धा जवाद यांनी शिघ्रतेने तेने कविता लिहिली.कवयित्री सुरेखा बिबवे यांच्या चिंतनशील कविता मन मोहवून घेते आहे.प्रा. मधुमिता निळेकर यांनीं उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आहे.
चंदन तरवडे यांनी आपल्या आईला आठवणीत साठवले.कोपरगाव शहरातील पण मुळचे विदर्भातून आलेल्या कवयित्री आरती परजणे ( वाघ ) यांनीही आपल्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवाधारीत कविता व आई विषयीची भावना,सासुबाई विषयावर अहिराणी भाषेतील कविता सादर केली.गजानन पंडित यांनी राजकीय व्यंग,सामाजिक विनोद,टिका टिपनी करून वातावरण आनंदी केले आहे.कवि संमेलनाचा आस्वाद घेता यावा म्हणून प्रविण कुमार शेलार,सुधाकर परजणे,शैला लावर, सुप्रिया निळेकर,वैष्णवी परळकर,अजीत कसाब,पोलीस उपनिरीक्षक फंड आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डॉ.तानाजी पाटील यांच्या संतसाहित्य ग्रंथास कोल्हापूर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे त्यामुळे त्यांना कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीने शाल श्रीफळ गुलाबपुष्प सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.राजेंद्र कोयटे यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले आहे.