जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

..या कारणावरून ‘तो’ खून,आरोपी अटक,कोपरगाव पोलिसांचे कौतुक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत लोणारी काँप्लेक्स समोर दोन अज्ञात भिक्षेकऱ्यांनी एका अज्ञात महिलेचा (वय-४०) खून केला होता याचा तातडीने तपास पोलीस अधिकारी यांनी सुरु करून आरोपी यास ताब्यात घेतले होते.त्याचा तपास केला असता सदर संशयित आरोपी इसम निसार कलाम खान (वय-२९) रा.भागलपुर बिहार यास ताब्यात घेतला असून त्याने खुनाचा गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या खुनानंतर कोपरगाव रेल्वे स्थानकावर एक संशयित आरोपी पळून जाताना रेल्वे स्थानकावर आढळला होता.त्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी आपला हिसका दखवला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली होती.त्याने मयत महिला हि सोनुकुमारी असल्याचे सांगितले होते.मयत महिला व आरोपी यांच्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करण्यावरून भांडण झाले होते.त्या किरकोळ कारणावरून आरोपीने तिचा दगडाने डोक्यावर,चेहऱ्यावर मारहाण करून खुन केला होता.त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर शिवारात कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर लोणारी काँप्लेक्स समोर दि.३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा अज्ञात हत्याराने खुन करण्यात आला होता.त्यांच्यात अज्ञात कारणावरून वादविवाद झाला होता.त्याचे पर्यवसान रात्री सदर महिलेचे डोके सदर व्यापारी संकुलाच्या भीतीवर डोके आपटून मारण्यात झाले आहे.त्यातून सादर महिला गंभीर जखमी झाली असून ती पहाटेच्या सुमारास गतप्राण झाली होती.याबाबत तेथील सी.सी.टी.व्ही.मध्ये सदर महिलेला ओढून नेताना चलचित्रण झाले असल्याची माहिती प्राप्त झाली होती.मात्र घनतस्थळावरून आरोपी फरार झाला होता.

दरम्यान याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा क्रं.२९९/२०२२ भा.द.वि.कलम ३०२ अन्वये दाखल केला होता.त्यामुळे या तपासाचे आव्हान कोपरगाव शहर पोलिसांपुढे निर्माण झाले होते.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी तपास सुरु केला होता.त्यात त्यांना कोपरगाव रेल्वे स्थानकावर एक संशयित आरोपी पळून जाताना रेल्वे स्थानकावर आढळला होता.त्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी आपला हिसका दखवला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली होती.त्याने मयत महिला हि सोनुकुमारी असल्याचे सांगिलते होते.मयत महिला व आरोपी यांच्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करण्यावरून भांडण झाले होते.त्या किरकोळ कारणावरून आरोपीने तिचा दगडाने डोक्यावर,चेहऱ्यावर मारहाण करून खुन केला होता.त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,रोहिदास ठोंबरे,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड,जे.पी.तमनर,संभाजी शिंदे,गणेश काकडे,राम खारतोडे,रहाणे,प्रकाश कुंढारे,सचिन शेवाळे,घोंगडे आदींचे सहकार्य लाभले आहे.पोलिसांच्या या तत्परतेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close