गुन्हे विषयक
वाहनांवर चोरट्यांची वक्रदृष्टी,कोपरगावात दोन गुन्हे दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीचा पांढऱ्या रंगाचा मालवाहू महिंद्रा मॅक्स टेंपो (क्रं. एम.एच.१५ बी.जे.६३५७) हा अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास कोणाचे लक्ष नाही हि संधी साधून चोरून नेला आहे.या प्रकरणी फिर्यादी यांनी भीमराज सूर्यभान खिरडकर (वय-२७) यांनी अज्ञातच चोरट्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तर दुसऱ्या चोरीत कन्हैया शिवाजी पांडे यांच्या वाहनातून देर्डे कोऱ्हाळे येथे उभे करून ठेवलेल्या वाहनातून २० हजार रुपयांची डिझल चोरी तर ४ हजार ५०० रुपयांची एक्साइड कंपणीच्या बॅटरीची चोरी झाली आहे.
संकल्पितच छायाचित्र.
फिर्यादी भीमराज खिरडकर यांचा फळांचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांनी आपल्या स्व-मालकीचा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा मॅक्स टेंपो खरेदी केला होता.त्याची आजची किंमत ९० हजार होती.तो त्यांनी तो दि.१० सप्टेंबर रोजी आपल्या येसगाव येथील भास्कर वस्ती येथे उभा करून ठेवला होता.मात्र त्यावर काही अज्ञात चोरट्यांचे लक्ष होते.त्यांनी दि.१० सप्टेंबर रोजी रात्रीच्या १०.३० ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटे ६ वाजे पूर्वीच्या सुमारास त्यास फरार केला आहे.तर दुसऱ्या चोरीत कन्हैया शिवाजी पांडे यांच्या वाहनातून देर्डे कोऱ्हाळे येथे उभे करून ठेवलेल्या वाहनातून २० हजार रुपयांची डिझल चोरी तर ४ हजार ५०० रुपयांची एक्साइड कंपणीच्या बॅटरीची चोरी झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील फळविक्रेते (ह.मु.साईसीटी कोपरगाव) भीमराज खिरडकर यांचा फळांचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांनी आपल्या स्व-मालकीचा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा मॅक्स टेंपो खरेदी केला होता.त्याची आजची किंमत ९० हजार होती.तो त्यांनी तो दि.१० सप्टेंबर रोजी आपल्या येसगाव येथील भास्कर वस्ती येथे उभा करून ठेवला होता.मात्र त्यावर काही अज्ञात चोरट्यांचे लक्ष होते.त्यांनी दि.१० सप्टेंबर रोजी रात्रीच्या १०.३० ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटे ६ वाजे पूर्वीच्या सुमारास त्यास फरार केला आहे.त्यांनी दोन दिवस त्याचा शोध घेऊनही उपयोग झाला नाही.अखेर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान दुसऱ्या चोरीत याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिहार ब्राम्हपुर जि.बक्सर ह.मु.वावी टोल नाक्याजवळ येथील चालक कन्हैया शिवाजी पांडे यांच्या वाहनातून देर्डे कोऱ्हाळे शिवारात गोदावरी कालव्याच्या जवळ उभे करून ठेवलेल्या पेव्हर मशीन या वाहनातून २० हजार रुपयांची डिझल चोरी तर ४ हजार ५०० रुपयांची एक्साइड कंपणीच्या बॅटरी असा २४ हजार ५०० रुपयांचा ऐवजाची चोरी झाली आहे.त्या विरोधात त्यांनी अज्ञातच चोरट्या विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक फौजदार आंधळे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.३६१/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे व पो.ना.कोकाटे हे करत आहे.दरम्यान वाहन चालक-मालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.