जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात महावितरणची मोठी चोरी पकडली !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी वाढली असून त्या विरोधात महावितरण कंपनीने आपल्या भरारी पथकाद्वारे दि.२२ ते २६ ऑगष्ट दरम्यान कारवाई केली असून त्या अंतर्गत शहरातील सुभद्रानगर,इंदिरापथ,कर्मवीर नगर,शिंगी-शिंदे नगर आदी ठिकाणच्या २३ घरगुती ग्राहकांवर कारवाई करत १० लाख ३० हजारांची दंडाची रक्कम वसूल केली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस प्राप्त झाली आहे.त्यामुळे शहरातील वीज चोरांत खळबळ उडाली आहे.

अलीकडील काळात महावितरणची मागणी २४५०० मेगावॅटच्या पुढे गेली आहे.ही मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन व महावितरण प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे.महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार.ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनधिकृत भार कमी करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महावितरणला दिले आहेत.त्यानुसार कोपरगाव शहरात वीज चोरांविरुद्ध कारवाई सुरु आहे.त्यामुळे वीजचोरांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे वीजचोरी विरुद्ध सातत्याने मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबविण्यात येतात या उपरही काही वीजग्राहक नवनवीन युक्त्या वापरून विजेची चोरी करीत असतात.अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानीत रक्कमेच्या दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते.वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाने तडजोड रकमेसह वीजचोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बक्षीस देण्यात येणार असून वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरूपात तर त्यावरील पैसे आरटीजीस किंवा एनईएफटीच्या माध्यमातून देण्यात येतील.सदरील माहिती बंद लिफाफयात लेखी स्वरूपात समक्ष कार्यकारी अभियंता यांना देऊन त्यांची पोच नागरिकांनी घ्यावी.माहिती देणाऱ्याचे नाव या सर्व प्रक्रियेत गुप्त ठेवण्यात येते.दिलेल्या माहितीवर तात्काळ कारवाई व तपासणी करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.त्यासोबतच आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील वीजचोरी कळविणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही सदर बक्षीस योजना लागू असेल.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज चोरीची माहिती थेट संचालक दक्षता व सुरक्षा यांना दूरध्वनीवरून देणे आवश्यक आहे.या संदर्भात अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वर्तमानात कोपरगाव शहरात महावितरण कंपनीच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच हि मोहीम राबवली त्या अंतर्गत हि १० लाख ३० हजांराची वसुली केली आहे.त्यात सुभद्रानगर,इंदिरापथ,कर्मवीर नगर,शिंगी-शिंदे नगर,घरगुती २३ ग्राहकांचा समावेश असल्याची माहिती महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे यांनी दिली आहे.त्याबाबत त्यांचे कोपरगाव शहरात कौतुक होत आहे.
दरम्यान महावितरण कंपनीने आपली सेवा सुधारून प्रामाणिकपणे जे ग्राहक आपली बिले भरतात त्यांना वीज पुरवठा करावा अशी मागणी कोपरगाव शहरातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close