गुन्हे विषयक
सख्या भावास टिकावाने मारहाण,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस सुमारे पंधरा कि.मी.अंतरावर असलेल्या सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले फिर्यादी इसम चंद्रकांत बाबुराव मंजुळे (वय-६०) यांना त्यांच्याच सख्या भावाने शेळी बांधण्याच्या किरकोळ कारणावरून शिवीगाळ दमदाटी करून टिकावाने मारहाण केल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने सोनेवाडीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
काल दि.३० ऑगष्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास फिर्यादी हा घरासमोर शेळी बांधण्यास गेला असता आरोपी भाऊ दौलत बाबुराव मंजुळे याने त्यास हरकत घेतली होती.त्यावरून दोघांत वादविवाद झाला होता.त्याचे पर्यवसान शिवीगाळ व दमदाटी आणि हाणामारीत झाले असून आरोपीने आपल्या हातातील टिकावाने फिर्यादी भावास मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इसम हा कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवासी आहे.फिर्यादीत व त्याच्या भावात किरकोळ कारणावरून वादविवाद सुरु असतात.
काल दि.३० ऑगष्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास फिर्यादी हा घरासमोर शेळी बांधण्यास गेला असता आरोपी भाऊ दौलत बाबुराव मंजुळे याने त्यास हरकत घेतली होती.त्यावरून दोघांत वादविवाद झाला होता.त्याचे पर्यवसान शिवीगाळ व दमदाटी आणि हाणामारीत झाले असून आरोपीने आपल्या हातातील टिकावाने फिर्यादी भावास मारहाण केली आहे.त्यामुळे सोनेवाडीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३३७/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,५०४,५०६ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक फौजदार अशोक गवसने हे करित आहेत.