सण-उत्सव
…या इंग्लिश मीडियम स्कूल स्वातंत्र्य दिन साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशाचा “७५ वा स्वातंत्र्य दिन” अमृत महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला असून आयुर्वेदाचार्य व राष्ट्रीय गुरु डॉ.रामदास आव्हाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.
शारदा संकुलातील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी कवायत संचालन करीत ध्वजाला मानवंदना दिली.तर अन्य विद्यार्थ्यांनी ढोल,झांज,ताशाच्या वाद्यात अतिशय लयबद्ध व जोशपूर्ण कवायतीचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहे.पूर्व प्राथमिक विभागाच्या बालचिमुरड्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीत सादर करून वातावरण देशप्रेममय केले.
भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुक्तचस संपन्न झाला आहे.आज पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात आले आहे.कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन संघटन समितीचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड,संस्थेचे प्राचार्य के.एल.वाकचौरे,दिनेश गुप्ता,शिरोळे सर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शार्दुल देव,सैन्य दलातील माजी अधिकारी श्री.साबळे आदी प्रमुख मान्यवरांसह पालक बहूसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी शारदा संकुलातील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी कवायत संचालन करीत ध्वजाला मानवंदना दिली.तर अन्य विद्यार्थ्यांनी ढोल,झांज,ताशाच्या वाद्यात अतिशय लयबद्ध व जोशपूर्ण कवायतीचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहे.पूर्व प्राथमिक विभागाच्या बालचिमुरड्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीत सादर करून वातावरण देशप्रेममय केले.तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या अनुक्रमे मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी भाषणांनी श्रोता वर्ग हरकून गेला.सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.श्री.रामदास आव्हाड यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर पारितोषिकही दिले आहे.