कोपरगाव तालुका
जुन्या स्नेहातून भविष्यातील सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल-प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नियमानुसार प्रत्येकाला सेवेतून निवृत्त व्हावे लागते त्यामुळे तुम्ही जरी सेवेतून निवृत्त होत असला तरी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना,उद्योग समूहाशी जुळलेले ऋणानुबंध कायमचे राहतील त्यातून त्यांनी भविष्यातील सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
“नोकरी करीत असतांना दिनचर्या ठरलेली होती.एका चाकोरीत राहून जीवन जगावे लागते.त्यामुळे सहाजिकच कुठेतरी मन मारून भावनांना आवर घालून आयुष्य व्यक्तीत काराव लागत.मात्र यापुढे चाकोरी बाहेर जाऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करतील”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष.साईबाबा संस्थान शिर्डी.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचा-यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त या कर्मचाऱ्यांचा कुटंबासह आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.अशोक काळे होते.
सदर प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक माजी आ.अशोककाळे,उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम,राजेंद्र घुमरे,सूर्यभान कोळपे,सचिन चांदगुडे,शंकरराव चव्हाण,अनिल कदम,अॅड.राहुल रोहमारे,प्रविण शिंदे,वसंतराव आभाळे,शिवाजीराव घुले,श्रीराम राजेभोसले, दिनार कुदळे,डॉ.मच्छिन्द्रनाथ बर्डे,अशोक मवाळ,सुनील मांजरे,मनोज जगझाप,सुरेश जाधव,विष्णु शिंदे,यांचेसह कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक संचालक सुनील कोल्हे,आसवनी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बी.बी.सय्यद,सहाय्यक सचिव एस.डी.शिरसाठ विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह निवृत्त कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”नोकरी करीत असतांना दिनचर्या ठरलेली होती.एका चाकोरीत राहून जीवन जगावे लागते.त्यामुळे सहाजिकच कुठेतरी मन मारून भावनांना आवर घालून आयुष्य व्यक्तीत काराव लागत.मात्र यापुढे चाकोरी बाहेर जाऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करतील.राहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करतांना आपल्या परिवाराला जास्तीत जास्त वेळ द्या.त्याचबरोबर आपल्या तब्येतीची देखील चांगल्या प्रकारे काळजी घ्या व परिवाराने देखील काळजी घ्यावी.
भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तरी तुमच्या हक्काचा माणूस समजून तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.आपण व आपल्या परिवाराने आजवर माजी आ.अशोक काळे यांच्या कुटुंबावर प्रेम केले ते यापुढेही असेच आबाधित राहू द्या.तुम्ही यापूर्वीही काळे परिवाराचे अविभाज्य घटक होता व यापुढेही काळे परिवाराचे घटक म्हणूनच राहणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले.सुत्रसंचालन सेक्रेटरी बी.बी.सय्यद यांनी केले तर आभार उपाध्यक्ष दिलीप बोरनारे यांनी मानले.यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परीवाराने आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.