नैसर्गिक आपत्ती
उत्तर नगर जिल्ह्यात पावसाची मोठी नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यात पावसाची मोठी नोंद
काल (७ ऑगस्ट २०२२) रोजी जिल्ह्यातील एका दिवसाचा सर्वाधिक ११२.५ मिलीमीटर पाऊस ‘शिर्डी’ त झाला. १ जून ते आतापर्यंत शिर्डीत ३०३.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.यापैकी कालच्या एका दिवसात ११२.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
संकल्पित छायाचित्र
अ.’नगर जिल्ह्यात १ जून पासून ते आतापर्यंत सरासरी ३०६.० मिलीमीटर पाऊस झाला आहे.कालच्या एकाच दिवसात जिल्ह्यात सरासरी १९.१ मिलीमीटर पाऊस झाला.कालच्या एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस कोपरगाव तालुक्यात सरासरी ६४.५ मिलीमीटर झाला.तर त्याखालोखाल राहाता तालुक्यात सरासरी ४७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी या एकाच दिवसात शिर्डी खालोखाल कोपरगाव तालुक्यातील रानवडे (९८.८मिलीमीटर), सुरेगांव (९८.८मिलीमीटर), दहिगांव (५१ मिलीमीटर), पोहेगाव (४७.३ मिलीमीटर) तसेच राहाता तालुक्यात पुणतांबा (४७.६ मिलीमीटर) व बाभळेश्वर (४१.५ मिलीमीटर), संगमनेर तालुक्यात धांदरफळ (६०.३ मिलीमीटर), राहूरी तालुक्यात सात्रळ (४६.५ मिलीमीटर), ताहराबाद (३७.५ मिलीमीटर), पाथर्डी तालुक्यातील टाकळी (४६.० मिलीमीटर) व पारनेर तालुक्यातील टाकळी (६५.८ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे.