जगावेगळा हरींनाम सप्ताह
गंगागिरीजी महाराज यांचा,’शतकोत्तर अमृत महोत्सवी हरींनाम सप्ताहाचा’ शुभारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
श्री सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी हरींनाम सप्ताहास आज नागपंचमी निमित्त श्री क्षेत्र सराला मठाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या सवाद्य मिरवणुकीने व पवित्र वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे.
या रथाच्या समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी यांच्या उंच प्रतिमा,पुढे दांडपट्टा धारी युवकांचे पथक,झांज पथक,त्यांपुढे डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सवाष्ण महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या विविध साधू संतांच्या वेशात लहान मुलांना बसविण्यात आले होते.या शिवाय ६०-७० टाळकरी मुले टाळ वाजवत ठेका धरून नाचत असताना आढळून आली आहे.त्यात आणखी भर म्हणून आत्मा मालिकच्या एन.डी.ए.बॅचचे,राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी आणखी भर घालून या कार्यक्रमाची उंची वाढवली होती.
सप्ताह स्थळी आगमन झाले त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत केले तो क्षण.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या,”शतकोत्तर अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे आज नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न होत असून त्याचा ध्वजारोहण सोहळा महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला होता.आज त्याचा प्रत्यक्ष शुभारंभ आज सुमारे एक लाख भाविक भक्तांच्या मांदियाळीत झाला आहे.
सप्ताह स्थळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करताना सप्ताह समितीचे स्वयंसेवक.
सदर प्रसंगी ह.भ.प.मधुकर महाराज,श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे,संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष कोल्हे,सप्ताह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाविक भक्त,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली संत परंपरा दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला तों क्षण.
प्रारंभी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महंत रामगिरीजी महाराज यांचे श्री क्षेत्र कोकमठाण या ठिकाणी आगमन झाले.त्यांचे कोकमठाण ग्रामस्थ व समस्त वैष्णवजण यांनी फटाक्याच्या आतषबाजीत व उंट,घोडे,रथात बसून मिरवणूक काढली होती.ग्रामदेवतेची महंत रामगिरीजी महाराज यांचे हस्ते विधिवत पूजाअर्चा करून पुणतांबा फाटा येथून त्यांची दुपारी १ वाजेच्या सुमारास भव्य मिरवणूक काढली होती.
सप्ताहस्थळी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरणासाठी आयोजित कृषी प्रदर्शन.
त्यावेळी रथाच्या समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी यांच्या उंच प्रतिमा,पुढे दांडपट्टा धारी युवकांचे पथक,झांज पथक,त्यांपुढे डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सवाष्ण महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या विविध साधू संतांच्या वेशात लहान मुलांना बसविण्यात आले होते.या शिवाय ६०-७० टाळकरी मुले टाळ वाजवत ठेका धरून नाचत असताना आढळून आली आहे.त्यात आणखी भर म्हणून आत्मा मालिकच्या एन.डी.ए.बॅचचे,राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी आणखी भर घालून या कार्यक्रमाची उंची वाढवली होती.तर सर्वात पुढे ढोल ताशे,बँजो पथक यांनी या कार्यक्रमात रंगत वाढवली होती.तर याखेरीज गरबा नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनींनी यात आणखी या कार्यक्रमाच्या सौन्दर्यात भर घातल्याचे दिसून आले आहे.
दुपारी १.३० सुमारास हा धार्मिक कुंभ सप्ताह स्थळी पोहचला होता.त्या नंतर विधिवत सप्ताह पूजन होऊन उपस्थित भाविकांना पूरण-पोळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले आहे.
या मिरवणुकीसाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पॊलीसांनी महामार्गावर जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता.व वहातून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने मोफत वैद्यकीय उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.
कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने मोफत वैद्यकीय उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.त्यात बूस्टर डोससह कोविड प्रतिबंधक लस,मोफत आरोग्य तपासणी,व औषध वाटप,रक्तदान शिबिर,आदींची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.याच विभागाने पाण्याचे स्वच्छ आरोग्यदायी पिण्याचे पाणी मिळेल यासाठी पाणी तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान सप्ताह स्थळी वाहनाचे पार्किंग स्थळी,पाणी पुरविण्यासाठी,स्वच्छता करण्यासाठी,उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटण्यासाठी २ हजार ५०० स्वयंसेवक सेवा बजावत असताना आढळून आले आहे.आजच्या पहिल्याच दिवशी साधारण ५०-६० हजार भाविक भक्त येतील असा अंदाज असताना हा आकडा पहिल्याच दिवशी १.५० लाखावंर गेला आहे.
आज महाप्रसादात पूरण-पोळीचा,मांड्याचा बेत करण्यात आला होता.तर त्यासाठी दुधाची व्यवस्था गोदावरी नामदेवराव परजणे तालुका दूध उत्पादक संघाने सुमारे ३१ हजार लिटर दुधाची व्यवस्था केली होती.तर याखेरीज सप्ताह समितीने एक हजार लिटर गुळवणी बनवले होते.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने मोफत वैद्यकीय उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.त्यात बूस्टर डोससह कोविड प्रतिबंधक लस,मोफत आरोग्य तपासणी,व औषध वाटप,रक्तदान शिबिर,आदींची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.याच विभागाने पाण्याचे स्वच्छ आरोग्यदायी पिण्याचे पाणी मिळेल यासाठी पाणी तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.त्या साठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली संवत्सर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.डी.खोत,आरोग्य समितीचे प्रमुख डॉ.शिवाजी रक्ताटे,डॉ.एस.एस.पोटे,जी.पी.नारळे,एस.टी.बनसोडे,एस.के.दुधाटकर,के.बी.घुमरे,व्ही.डी.धनवटे,आदी लक्ष ठेऊन आहेत.
दरम्यान या मेळ्यात बहुतांशी शेतकरी वर्ग श्रद्धा ठेऊन येत असल्याने शेतकऱ्यांपर्यंत नवीन कृषी संशोधन पोहचावे यासाठी शेतकरी सुमारे तीन एकर परिसरात ‘कृषी प्रदर्शना’चे आयोजन केले आहे.त्याचा लाभ घेताना शेतकरी आढळून आले आहे.त्यात महिला शेतकऱ्यांचा सहभाग आढळून आला आहे.याखेरीज खेळणी,खवय्यांसाठी मिठाई,विविध करमणूकीचे साधने उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे.सर्व परिस्थितीवर सप्ताह समितीचे अध्यक्ष सुधाकर रोहोम,बाजार समितीचे माजी संभाजी रक्ताटे,शरद थोरात,रंगनाथ लोंढे आदींसह कार्यकर्ते,स्वयंसेवक नियंत्रण ठेऊन असल्याचे दिसून आले आहे.