गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातील गंभीर गुंह्यातील आरोपी जेरबंद,पोलिसांचे मोठे यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला व सहा महिन्यापासून गंभीर गुंह्यातील फरार असलेला आरोपी नारायण वायकर यांस कोपरगाव तालुका पोलिसांनी नुकतेच मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.पोलिस अधिकाऱ्यांचे या बाबत ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
कोपरगाव तालुका पोलीस गेले सात महिने पोलीस आरोपी नारायण वायकर याच्या मागावर होते.मात्र अनेक वेळा त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला होता.त्याच्यावर शिर्डी,कोपरगाव तालुका पोलीस ठाणे,नेवासा आदी ठिकाणी दरोडे,चोरी,जीवे मारण्याचा प्रयत्न आदी गंभीर अठरा गुन्हे दाखल झालेले आहे.यापूर्वी पोलिसांनी त्यास संघटित गुन्हेगारी विरुद्ध असलेला ‘मोक्का’ लावला आहे.व तो सात वर्ष कारागृहात शिक्षा भोगून आलेला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी सोमनाथ जालिंदर गव्हाणे (वय-२१) याच्या भाऊ सागर गव्हाणे याने आरोपी नारायण वायकर व सुरेश नामदेव वायकर याना दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हूणून दि.२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बबन साळवे याच्या वडा पावच्या गाडीजवळ लाथाबुक्यांनी मारहाण केली होती.त्याचा आवाज ऐकून फिर्यादी त्यास सोडविण्यासाठी गेला असता आरोपीं नारायण वायकर याने चाकुसारख्या हत्याराने त्याच्या डाव्या बरगडीजवळ वार केला होता.त्यात तो गंभीर जखमी झाला होता.तर फिर्यादीच्या भावाला विटाने मारहाण करून नारायण वायकर फरार झाला होता.
कोपरगाव तालुका पोलीस गेले सात महिने पोलीस त्याच्या मागावर होते.मात्र अनेक वेळा त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला होता.त्याच्यावर शिर्डी,कोपरगाव तालुका पोलीस ठाणे,नेवासा आदी ठिकाणी दरोडे,चोरी,जीवे मारण्याचा प्रयत्न आदी गंभीर अठरा गुन्हे दाखल झालेले आहे.यापूर्वी पोलिसांनी त्यास संघटित गुन्हेगारी विरुद्ध असलेला ‘मोक्का’ लावला आहे.व तो सात वर्ष कारागृहात शिक्षा भोगून आलेला आहे.
त्यामुळे पोलीस त्याचा जागोजागी ठाव घेत असताना त्याचा शिर्डी,नेवासा,कोपरगाव तालुका पोलीस शोध घेत होते.मात्र तो पोलिसांना त्याने शोध घेऊनही तीन वेळा गुंगारा देत होता.तो ओगदी येथील शेतकरी लक्ष्मण कुदळे यांचे शेतात शेतमजूर म्हणून काम करत असल्याची गुप्त खबर मिळाली होती.त्या नुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला होता.
त्यानुसार पोलिसांनी त्यास कुठलीही चाहूल न लागता त्याचा फास आवळला होता.त्या ठिकाणी त्यास नुकतीच अटक केली आहे.या कामी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पो.हे.कॉ.विजय पाटील,इरफान शेख,श्री झडे,चार गृहरक्षक दलाचे जवान आदींनी यशस्वी प्रयत्न केले आहे.पोलीस अधिकारी जाधव,सहाययक पोलीस निरीक्षक आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.