गुन्हे विषयक
वीज जोडणी वायर काढल्याने मारहाण,कोपरगावात चौघांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादिस,”तू आमची विद्युत खांबावरील वायर का काढली” असे म्हणत आरोपी संजय रावसाहेब चव्हाण सह अन्य तिघांनी आपल्याला घराच्या पाठीमागे वाघ वस्तीवर दि.१० जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास लोखंडी गजाने मारहाण केली असल्याची फिर्याद विनायक अशोक चव्हाण (वय-४०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने दहिगाव बोलका सह परिसरात खळबळ उडाली आहे.
दि.१० जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास आरोपी संजय चव्हाण हा आपल्या सहकाऱ्यासंमवेत घटनास्थळी आला व त्याने फिर्यादी विनायक चव्हाण यास जाबसाल करत विचारले की,”तू, आमच्या विद्युत खांबावरील वीज जोडणीची वायर का काढली असे विचारून फिर्यादिस वाईट-वाईट शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्यांनी व लोखंडी गजाने डोक्यात,पाठीवर मारहाण केली आहे.तर आरोपी ज्योती संजय चव्हाण व सूरज संजय चव्हाण सिद्धार्थ संजय चव्हाण आदिनीं फिर्यादिस व त्याच्या पत्नीस वाईट साईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी हा दहिगाव बोलका येथील रहिवासी असून तो शेतकरी आहे.त्यांची व प्रमुख आरोपी संजय चव्हाण यांची शेजारी शेजारी जमिनीचे क्षेत्र आहे.शेजारी आरोपी चव्हाण यांनी फिर्यादीच्या शेतातून जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या विद्युत पोलवरून त्याच्या शेतात जाणाऱ्या क्षेत्रांत वायर टाकून वीज पुरवठा सुरु केलेला होता.दि.१० जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास आरोपी संजय चव्हाण हा आपल्या सहकाऱ्यासंमवेत घटनास्थळी आला व त्याने फिर्यादी विनायक चव्हाण यास जाबसाल करत विचारले की,”तू, आमच्या विद्युत खांबावरील वीज जोडणीची वायर का काढली असे विचारून फिर्यादिस वाईट-वाईट शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून लोखंडी गजाने डोक्यात,पाठीवर मारहाण केली आहे.तर आरोपी ज्योती संजय चव्हाण व सूरज संजय चव्हाण सिद्धार्थ संजय चव्हाण आदिनीं फिर्यादिस व त्याच्या पत्नीस वाईट साईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी विनायक चव्हाण याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,हे.कॉ.आर.एम.म्हस्के आदींनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२७२/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ या कलमा प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.म्हस्के हे करीत आहेत.