धार्मिक
..या गावात अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी पूर्ण,भाविकांची प्रतीक्षा

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
देशभरात प्रसिद्ध असलेल्या सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या शतकोत्तर,’अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे दि.०२ ऑगष्ट पासून संपन्न होत असून त्याचा ध्वजारोहण सोहळा महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते गुरुवार दि.२१ जुलै सकाळी ११ वाजता संपन्न होत असल्याची माहिती सप्ताह समितीने आज दुपारी ०१ वाजता आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
‘अखंड हरिनाम सप्ताह’ हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे.इंग्रज राजवटीत ग्रामस्थांची अन्नाविना उपासमार होत असलेल्या प्रतिकूल कालखंडात,”लेणे को हरींनाम और देणे को अन्नदान” हा जप करत तत्कालीन महंत सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांनी सुरु केलेल्या या वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे.त्यामुळे या काळात हा सप्ताह नावारूपास आला आहे.यावर्षी शतकोत्तर अमृत वर्षाचा सप्ताह श्री क्षेत्र कोकमठाण येथे संपन्न होत आहे.त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.
‘अखंड हरिनाम सप्ताह’ हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे.इंग्रज राजवटीत ग्रामस्थांची अन्नाविना उपासमार होत असलेल्या प्रतिकूल कालखंडात,”लेणे को हरींनाम और देणे को अन्नदान” हा जप करत तत्कालीन महंत सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांनी सुरु केलेल्या या वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे.त्यामुळे या काळात हा सप्ताह नावारूपास आला आहे.त्यांच्या नंतर हि धुरा महंत दत्तगिरीजी महाराज,सद्गुरू नाथगिरीजी महाराज,महंत सोमेश्वरगिरीजी महाराज,व त्यानंतर त्यांनी ती महंत नारायणगिरीजी महाराज यांचेकडे सोपवली होती.दि.१९ मार्च २००९ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले होते.त्या नंतर हि धुरा महंत रामगिरीजी महाराज यांनी यशस्वीपणें सांभाळली आहे.
जगभर कोरोना साथीचा कहर समाप्त झाल्यानंतर हा पहिलाच सप्ताह संपन्न होत आहे.त्यामुळे या सप्ताह कडे भाविकांचे लक्ष लागून आहे.हा सप्ताह आषाढी एकादशी नंतर येत असल्याने आषाढी एकादशी संपन्न झाल्यावर सर्व भागवत पंथीय भाविकांना त्याची मोठी उत्सुकता असते.ती वेळ आता अंतीम टप्यात आली आहे.
श्री सराला बेट हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कापूस वाडगाव येथून या सप्ताहाची सुरुवात सन-१८४७ पासून झाली होती.आज या सप्ताहास पावणे दोनशे वर्ष होत आहे.या सप्ताहाने दर वर्षी नवनवे उच्चांक प्रस्थापित केले आहे.२०१७ साली राज्याचे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याच्या निम्म्याहून अधिक मंत्री मंडळाने या सप्ताहाला हजेरी लावली होती.गिनीच बुकात याच वर्षी या सप्ताहाची नोंद झाली आहे.सन-२००९ सालापासून या सप्ताहाची जबाबदारी नारायणगिरी महाराज यांच्या महानिर्वाणा नंतर महंत रामगिरीजी महाराज यांचे कडे चालून आली होती.त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली भव्य मंदिराची उभारणी केली आहे.या पूर्वी गंगागिरीजी महाराज यांची थोर परंपरा चालविणाऱ्या विविध महंत आणि महाराजांनी फक्त अनासक्त भक्तीला महत्व दिले होते.स्वतः गंगागिरीजी महाराज आपल्या कार्यकाळात आषाढी वारीला जाताना आपल्या निवासासाठी असलेल्या झोपडीलाही आगीच्या स्वाधीन करत असत हा यांच्यातील फरक डोळ्यात भरण्यासारखा आहे.
जगभर कोरोना साथीचा कहर समाप्त झाल्यानंतर हा पहिलाच सप्ताह संपन्न होत आहे.त्यामुळे या सप्ताह कडे भाविकांचे लक्ष लागून आहे.हा सप्ताह आषाढी एकादशी नंतर येत असल्याने आषाढी एकादशी संपन्न झाल्यावर सर्व भागवत पंथीय भाविकांना त्याची मोठी उत्सुकता असते.
हा सप्ताह एकूण १६५ एकर परिसरात संपन्न होत आहे.त्यासाठी ग्रामस्थ व भाविक भक्तांचे श्रमदान अभिप्रेत आहे.त्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असते.अंतर्गत रस्ते काम संपत आले आहे.वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.सदर ठिकाणीही आलेल्या भाविकांना चोवीस तास पाणी.पावसामुळे स्वयंपाक करण्यासाठी व भजनी मंडळासाठी मंडप असतोच पण यावेळी २००-२५० दोन मंडप जेवणासाठी प्रथमच तयार करण्यात आला आहे हे यातील महत्वाचे वैशिष्ट्य आहे.भाविकांसाठी आमटी आणि भाकरी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक ०२ ऑगस्ट ते ०९ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कोपरगाव शिर्डी रोडवर कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत श्री संत जंगलीदास महाराज आश्रमाशेजारी सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे.त्या सप्ताहाचे नियोजन अंतिम टप्यात आले असून त्यासाठी माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
सदर प्रसंगी हा सप्ताह एकूण १६५ एकर परिसरात संपन्न होत आहे.त्यासाठी ग्रामस्थ व भाविक भक्तांचे श्रमदान अभिप्रेत आहे.त्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असते.अंतर्गत रस्ते काम संपत आले आहे.वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.सदर ठिकाणीही आलेल्या भाविकांना चोवीस तास पाणी.पावसामुळे स्वयंपाक करण्यासाठी व भजनी मंडळासाठी मंडप असतोच पण यावेळी २००-२५० दोन मंडप जेवणासाठी प्रथमच तयार करण्यात आला आहे हे यातील महत्वाचे वैशिष्ट्य आहे.भाविकांसाठी आमटी आणि भाकरी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहाची बहुतांशी वर्ग हा ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग असतो त्यामुळे त्यांना आधुनिक शेती शिक्षण मिळण्यासाठी व आधुनिक साहित्याची माहिती मिळण्यासाठी भाविक शेतकऱ्यांसाठी,”आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन” आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी महावितरण कंपनीच्या वतीने चोवीस तास विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.या सप्ताहाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपस्थित कोकमठाण सप्ताह समिती आणि आयोजकांनी केले आहे.