गुन्हे विषयक
कोपरगाव शहरात हाणामारी,माजी नगरसेवक जखमी,चौघांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील हनुमंनगर येथील रहिवासी असलेले माजी नगरसेवक सोमनाथ रामचंद्र म्हंस्के (वय-४६) हे हनुमान मंदिरासमोर रात्री ९.४५ वाजता सुरु असलेले भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्याचा राग मनात धरून आरोपी सुरेश आवारे,मुस्तफा शेख,इम्रान कालु कच्छी,नाजीम शेख (पूर्ण नावे उपलब्ध नाही) यांनी त्यांना डोक्यावर विटांच्या तुकड्यांची मारून दुखापत केली आहे.तर फिर्यादी यांचा जोडीदार सुरेश यास मारहाण करुन गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे भांडण सोडणीवण्यासाठी गेले असता आरोपी सुरेश आवारे,मुस्तफा शेख,इम्रान कालु कच्छी,नाजीम शेख (पूर्ण नावे उपलब्ध नाही) यांना राग आला व त्यांनी मूळ भांडण सोडून देऊन म्हंस्के यांच्यावरच राग काढला आहे.त्यात त्यांनी त्यांच्या डोक्यावर विटांच्या तुकड्यांची डोक्याला व डोळ्यावर मारून गंभीर दुखापत केली आहे.तर फिर्यादी यांचा जोडीदार सुरेश यास मारहाण करुन जखमी केले आहे.संबंधित माजी नगरसेवक ईशान्य गडाशी संबंधित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी सोमनाथ म्हस्के हे हनुमान नगर येथील रहिवासी व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक असून दि.३० जूनच्या रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास त्यांना हनुमान मंदिरासमोर काही तरुण गोंधळ करत असल्याचे समजले.त्यांनी त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्याठिकाणी धाव घेतली होती.व सदर भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.याचा आरोपी सुरेश आवारे,मुस्तफा शेख,इम्रान कालु कच्छी,नाजीम शेख (पूर्ण नावे उपलब्ध नाही) यांना राग आला व त्यांनी मूळ भांडण सोडून देऊन म्हंस्के यांच्यावरच राग काढला आहे.त्यात त्यांनी त्यांच्या डोक्यावर विटांच्या तुकड्यांची मारून दुखापत केली आहे.तर फिर्यादी यांचा जोडीदार सुरेश यास मारहाण करुन जखमी केले असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.यात सोमनाथ म्हस्के व त्यांचा सहकारी सुरेश (आडनाव उपलब्ध नाही) हे दोघे गंभीररित्या जखमी झाले आहे.त्याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२००/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.