कृषी व दुग्ध व्यवसाय
टोमॅटो प्लास्टिक व्हायरस कारणे व उपाय

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वातावरणामध्ये जसे बदल होतात आणि त्या बदलांमुळे माणसं आजारी पडतात.अगदी तसेच पिकांच्या बाबतीत देखील होत असते.उन्हाळा संपला,पावसाळा चालू झाला की व्हायरस चालू होत असतो आणि तो टोमॅटोमध्ये सुरुवातीला आढळून येतो.आणि टप्प्याटप्प्याने मिरची,काकडी, भोपळा,पपई या पिकांमध्ये देखील शिरकाव करत असतो.पिक व्हायरसला बळी पडतं त्यामागील प्रमुख कारण म्हणजे पिकांमध्ये वाढलेली कीड आणि रोग तसेच त्यासाठी घेत असलेल्या अति विषारी रासायनिक किटकनाशकांचा फवारण्या त्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कमी-जास्त अन्नद्रव्याचा पुरवठा,जास्त पाणी किंवा जास्त पाण्याचा ताण आणि जमिनीमध्ये वाढत असलेले क्षार हे टोमॅटो पिकातील व्हायरस रोग वाढी मधील प्रमुख कारणे आहेत.
“टोमॅटो पिकामध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याद्वारे जमिनीमध्ये क्षार मोठ्या प्रमाणात जातात आणि क्षार वाढले की सूत्रकृमी वाढतात व सूत्रकृमी वाढले की मुळकुज होते व मुळकूज झाली की कुपोषण होते आणि कुपोषण झाले की तिथे व्हायरस आलाच अशी परिस्थिती आपल्याला सर्वत्र दिसते.आणि म्हणून या परिस्थितीवर नियंत्रण आणायचे असेल तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करणे गरजेचे आहे”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,आंतरराष्ट्रीय किटकतज्ञ.
टोमॅटो पिकामध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याद्वारे जमिनीमध्ये क्षार मोठ्या प्रमाणात जातात आणि क्षार वाढले की सूत्रकृमी वाढतात व सूत्रकृमी वाढले की मुळकुज होते व मुळकूज झाली की कुपोषण होते आणि कुपोषण झाले की तिथे व्हायरस आलाच अशी परिस्थिती आपल्याला सर्वत्र दिसते.आणि म्हणून या परिस्थितीवर नियंत्रण आणायचे असेल तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.तेव्हा मररोग व सूत्रकृमी यांचे नियंत्रण करुन पिकास पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा चालू झाला पाहिजे.आणि ते चालू झाल्यानंतर व्हायरस चा साधारणपणे १५ ते २५ दिवसांच्या दरम्यान पुर्नलागवडीनंतर टोमॅटो पिकामध्ये रिकव्हर ची २५० मिली आणि सिलिकॉन सुपर ५०० ग्रॅम मिसळून पहिली फवारणी घेणे अपेक्षित आहे.
त्यामध्ये एंजाइम आणि प्रथिने यांच्या निर्मितीसाठी झिंक याची देखील एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिश्रण करून फवारणी घ्यावी .या फवारणीमुळे व्हायरस वर ८० ते ९० टक्के नियंत्रण पहिल्याच टप्प्यात मिळतं आणि उत्पादनातील घट ही थांबते तसेच या फवारणी बरोबर टोमॅटो प्लॉटमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव हा असतोच आणि सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी २०० लिटर पाण्यामध्ये एक लिटर रिप्लेस आणि एक लिटर हेल्मेट हे आपण मिसळून त्याची ड्रीप द्वारे ड्रिंचिंग केली असता व्हायरस वर तात्काळ नियंत्रण मिळते आणि उत्पादनातील घट थांबत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.