वन व पर्यावरण
माझी वसुंधरा अभियानात…या नगरपंचायतीची कामगिरी सर्वोत्तम

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी,जल,वायू,अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. माझी वसुंधरा अभियान २.० मधील नगर पंचायत गटांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नगरपंचायत मध्ये शिर्डी नगरपंचायतीच्या समावेश झाला आहे.शिर्डी नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
माझी वसुंधरा अभियान हा माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत पहिला उपक्रम आहे. हा महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वांवर (पंचमहाभूतांवर ) आधारित कृतीशिल उपक्रम आहे.
हे अभियान 2 ओक्टोबर, 2020 रोजी माननीय मंत्री – पर्यटन, राजशिष्टाचार, पर्यावरण आणि वातावरणीय बदल यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान हा माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत पहिला उपक्रम आहे. हा महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वांवर (पंचमहाभूतांवर ) आधारित कृतीशिल उपक्रम आहे.हे अभियान ०२ ओक्टोबर २०२० रोजी माननीय मंत्री-पर्यटन, राजशिष्टाचार,पर्यावरण आणि वातावरणीय बदल यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे.या उपक्रमांतर्गत शिर्डीला हा पुरस्कार लाभला आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन,संरक्षण व जतन करण्यासाठी केलेल्या या कामगिरी बाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांचे वतीने प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा रविवार, ५ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली,उप मुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा थिएटर, एन.सी.पी.ए.,नरीमन पाईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती माझी वसूंधरा अभियान संचालनालयाचे अभियान संचालक सुधाकर बोबडे यांनी दिली आहे.