सामाजिक उपक्रम
कोपरगावात…या सेनेचे दिव्यांग पास शिबिर संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मनसे दिव्यांग सेना आयोजित अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना रेल्वे पास काढण्यासाठी नुकतेच शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती कोपरगाव तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पारखे यांनी दिली आहे.
रेल्वेगाड्यांमधून प्रवासासाठी अपंगांना तिकीट खिडकीवर सवलतीचे पास तिकीट देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती.त्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.या विरोधात रेल्वे प्रशासन राज्य सरकारकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नव्हती.मात्र अपंग कल्याण आयुक्तालयात तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वेने त्याची दखल घेतली असून मनसेने कोपरगावात तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना हे पास देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.
भारतीय रेल्वेगाड्यांमधून प्रवासासाठी अपंगांना तिकीट खिडकीवर सवलतीचे पास तिकीट देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती.त्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.या विरोधात रेल्वे प्रशासन राज्य सरकारकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नव्हती.मात्र अपंग कल्याण आयुक्तालयात तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वेने त्याची दखल घेतली.एप्रिल मध्ये सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली.अपंग आणि त्यांच्यासोबत एका प्रवाशाला परवानगी देण्यात आली.मात्र अपंगांना उपनगरी रेल्वेचे सवलतीचे पास आणि तिकीट देण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नकार देण्यात आल्याच्या तक्रारी अंपगांनी केल्या.होत्या त्यावर अपंग कल्याण आयुक्तालयाच्या आदेशानंतर रेल्वेने सवलतीचे पास व तिकीट देण्याविषयी निर्णय घेतल्याचे निर्धार विकलांग विकास सामाजिक संघाने सांगितले आहे.त्यानंतर राज्यात अपंगांना पास देण्यास सुरुवात झाली आहे.त्याचा लाभ घेण्यासाठी कोपरगावात हे शिबिर मनसेने अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित केले होते. शिबिराचा प्रारंभ जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांच्या हस्ते करण्यात आले होते.त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.
सदर प्रसंगी हे मनसेचे तालुका उपाध्यक्ष अनिल गायकवाड,मार्गदर्शक सुनील फंड,वारी सरपंच सतीश कानडे सरपंच आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबिरात जवळपास सुमारे १०० दिव्यांग बंधू-भगिनींनी रेल्वे पास काढन्याचा लाभ घेतला आहे.हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी खालील मनसे दिव्यांग सेनेच्या कोपरगाव पदाधिकाऱ्यांनी कामगिरी बजावली आहे.त्यास मुकुंद पदे,अरुण जगताप,गणेश वाघ,रेणुका मुंनसी आदीनीं सहकार्य केले आहे.