निधन वार्ता
संवत्सर येथील ग्रा.पं.सदस्य जगताप यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया मत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संवत्सर ग्रापंचायतीचे माजी सदस्य शैलेश ज्ञानदेव (बाबासाहेब) जगताप (वय-५२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने आज सकाळी ०८.१५ वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नगर जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांचे निष्ठावान सहकारी गणले जात.त्यांच्या निधनाबाबत गोदावरी तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दुःख व्यक्त केले आहे.स्व.शैलेश जगताप हे अत्यन्त मितभाषी म्हणून गणले जात.त्यांच्यावर आज संवत्सर येथे गोदावरी तीरावर सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.