निधन वार्ता
भाजप कार्यकर्ते शिंदे यांना पितृशोक

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील भाजपचे कार्यकर्ते सचिन शिंदे यांचे पिताश्री व भारतीय सैन्यात १९६५ च्या युद्धात सक्रिय भूमिका निभावणारे सेवा निवृत्त सैनिक निवृत्ती शामराव शिंदे (वय-८०) यांचे नुकतेच आपल्या रहात्या घरी निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने शिर्डी राहता तालुका व परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
स्व.निवृत्ती शिंदे यांनी भारतीय सैन्यात त्यांनी आपली सेवा बजावली होती.त्यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रिय भूमिका निभावली होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पच्छात तीन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या पत्नीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले होते.त्यातून सावरले होते.त्यांच्यावर शिर्डी येथील अमर धाम येथे नुकतेच शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आहे.त्या प्रसंगी जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर,माजी नगराध्यक्ष कैलास कोते,विद्यमान नगराध्यक्ष शिवाजी कोते,माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके,कमलाकर कोते,मुकुंद कोते आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.